भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्यात भारतीय फिरकी गोलंदाज शाहबाज नदीमला अगदी शेवटच्या क्षणी संघात समाविष्ट करण्यात आले होते. पहिल्या ११ खेळाडूत अक्षर पटेलला संघात स्थान मिळणार होते. परंतु त्याला दुखापत झाली आणि त्याच्या ऐवजी शाहबाज नदीम याला संघात समाविष्ट करण्यात आले.
नदीम आपल्या कारकिर्दितला दुसरा कसोटी सामना खेळत आहे. इंग्लंड संघाचे फलंदाज त्याच्या गोलंदाजीवर रिव्हर्स स्वीप शॉट खेळत धावा कुटत होते. ४४ षटके गोलंदाजी करून नदीम याने १६७ धावा खर्च केल्या. यात त्याने जो रूट आणि बेन स्टोक्स हे मुख्य फलंदाज बाद केले.
नो बॉलवर दिली प्रतिक्रिया
नदीमने दिवसाच्या खेळानंतर दिलेल्या मुलाखतीत म्हंटले की, “मी ऑफ स्टंपच्या बाहेर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करत होतो. परंतु इंग्लंडच्या फलंदाजांनी रिव्हर्स स्वीप खेळत प्रत्त्युत्तर दिले. यामुळे मला लाईन आणि लेंथ मध्ये बदल करावा लागला. त्यानंतर मी विकेट्स घेतल्या.”
नदीमने या सामन्यात आतापर्यंत ६ नो बॉल फेकले आहेत. यावर त्याने आपली चूक मान्य करत म्हंटले की, “मला वाटत आहे की, मी धावपट्टीवर थोडा उशिराने उडी मारत आहे. मला उडी थोडी लवकर मारावी लागले. यामुळेच मला गोलंदाजी करतांना थोडा त्रास होत होता.”
जो रूटचे केले कौतुक
रूटबद्दल बोलताना नदीम म्हणाला, “रूट हा अतिशय उत्तम फलंदाज आहे. आणि गेल्या काही महिन्यांपासून तो चांगल्याच फॉर्म मध्ये आहे. त्याने उत्कृष्ट प्रकारे स्वीप शॉट खेळले आहे. यामुळेच गोलंदाजाला रणनीती आखून खेळावे लागते. पण अशातच फलंदाजाने स्वीप शॉट खेळायला सुरुवात केली की गोलंदाजाला आपल्या रणनीतीवर अडून राहावे लागते आणि फलंदाज चूक करेल याची वाट पाहावी लागते.”
महत्वाच्या बातम्या:
नासिर हुसेन यांनी उधळली जो रूटवर स्तुतिसुमने, म्हणाले
कोणाचा कव्हर ड्राईव्ह सर्वोत्तम? आयसीसीने घेतलेल्या पोलमध्ये या खेळाडूला मिळाली सर्वाधिक मते
आयपीएल गाजवणाऱ्या एनरिच नॉर्टजेची पाकिस्तानविरुद्ध भेदक गोलंदाजी, पाहा व्हिडिओ