धरमशाला स्टेडियमवर मंगळवारी (17 ऑक्टोबर) दक्षिण आफ्रिका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पावसामुळे दक्षिण आफ्रिका आणि नेदर्लंड्स यांच्यातील हा सामना ठरलेल्या वेळेपेक्षा उशिरा सुरू झाला. पंचांनी ठरवल्याप्रमाणे निर्धिरीत 43 षटकांमध्ये नेदर्लंड्स संघ 8 बाद 245 धावांपर्यंत मजल मारू शकला. कर्णधार स्कॉट एडवर्ड्स याने 78* धावांची सर्वोत्तम खेळी केली.
दक्षिण आफ्रिकेसाठी लुन्गी एनगिडी, कागिसो रबाडा आणि मार्को यान्सेन यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. गेराल्ड कोएत्झे आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. शेवटच्या षटकांमध्ये कर्णधार स्कॉट एडवर्ड्स आणि आर्यन दत्त यांनी दक्षिण आफ्रिकी गोलंदाजांची तुफान धुलाई केली. नेदर्लंड्सची धावसंख्या 34 षटकांनंतर 7 बाद 141 धावा होती. पण शेवटच्या काही षटकांमध्ये केलेल्या धुलाईमुळे संघाची धावसंख्या 43 षटकांनंतर 8 बाद 245 धावांपर्यंत पोहोचली.
नेदर्लंड्ससाठी या सामन्यात कर्णधार ऍडवर्ड्सव्यतिरिक्त एकही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. सलामीवीर मध्यक्रम आणि तळातील फलंदाजांमध्ये एकालाही 30 धावांची खेळी करता आली नाही. रोलोफ वॅन डर मर्वी याने 29 धावांचे योगदान दिले. संघासाठी ही दुसरी सर्वोत्तम खेळी ठरली. (Netherlands finished with 245/8 in 43 overs. Captain Scott Edwards remained Unbeaten on 78*)
उभय संघांची प्लेइंग इलेव्हन –
दक्षिण आफ्रिका – क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), टेम्बा बावुमा (कर्णधार), रासी व्हॅन डर ड्युसेन, एडन मार्करम, हेन्रीच क्लासेन, डेविड मिलर, मार्को यान्सेन, केशव महाराज, लुंगी एन्गिडी, कागिसो रबाडा, गेराल्ड कोएत्झे.
नेदरलँड्स – विक्रमजीत सिंग, मॅक्स ओ’डौड, कॉलिन एकरमन, बास डी लीड, तेजा निदामनुरु, स्कॉट एडवर्ड्स (यष्टीरक्षक/कर्णधार), सीब्रँड एंजेलब्रेच, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, लोगन वॅन बिक, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकेरेन.
महत्वाच्या बातम्या –
SAvsNED । वयाच्या 28व्या वर्षी रबाडाने पार केला मैलाचा दगड! वनडेतील आकडेवारी भूरळ घालणारी
श्रीलंका क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय! लैंगिक अत्याचाराचे आरोप असणाऱ्या फलंदाजाला दिली खेळण्याची परवानगी