भारतीय क्रिकेट संघाचा न्यूझीलंड दौरा बुधवारी (30 नोव्हेंबर) समाप्त झाला. उभय संघातील वनडे मालिका यजमान न्यूझीलंड संघाने 1-0 अशा फरकाने आपल्या नावे केली. या मालिकेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) खेळाडूंची नवी क्रमवारी जाहीर केली आहे. या मालिकेत भारतीय संघाकडून चांगली कामगिरी केलेल्या श्रेयस अय्यर व शुबमन गिल यांना या नव्या क्रमवारीत चांगलाच फायदा झाला आहे.
या वनडे मालिकेतील दोन सामने पावसामुळे रद्द करण्यात आले. मात्र, भारतीय फलंदाजांना पुरेशी संधी मिळाली. त्यात कर्णधार शिखर धवन, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव व श्रेयस अय्यर यांचा समावेश होता. मालिकेतील पहिला सामन्यात अर्धशतक झळकावलेला शिखर हा इतर दोन सामन्यात अपेक्षित कामगिरी करू शकला नाही. त्यामुळे त्याला दोन स्थानांचे नुकसान सहन करावे लागले. आता तो 15 व्या स्थानावर पोहोचला आहे.
या मालिकेत भारतीय संघासाठी सर्वाधिक धावा श्रेयस अय्यरने ठोकल्या होत्या. याचा फायदा घेत तो थेट सहा स्थानांची प्रगती करत 27 व्या क्रमांकावर पोहोचला. तर, पहिल्या दोन सामन्यात चमकलेल्या शुबमन गिललाही तीन स्थानांचा फायदा झाला. त्यामुळे तो कारकिर्दीतील सर्वोत्तम 34 व्या स्थानी आला. या मालिकेसाठी भारतीय संघात समाविष्ट नसलेले विराट कोहली व रोहित शर्मा प्रत्येकी एका स्थानाच्या नुकसानासह आठव्या व नवव्या क्रमांकावर पोहोचले. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन याने मालिकेतील पहिल्या सामन्यात 94 धावा केल्या होत्या. त्यामुळे तो याप्रमाणे दहाव्या क्रमांकावर पोहोचला.
एकूण क्रमवारीचा विचार केल्यास पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम अद्यापही पहिल्या क्रमांकावर कायम आहे. पाकिस्तानचाच इमाम उल हक दुसऱ्या, दक्षिण आफ्रिकेचे रॅसी वॅन डर डसेन व क्विंटन डी कॉक आणि ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या व पाचव्या क्रमांकावर आहेत.
(New ODI Batting Ranking Shreyas Iyer And Gill Goes Up)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतीय संघाला ‘ही’ गोष्ट जमली नाही! मालिका गमावल्यानंतर कर्णधार धवनने केले मान्य
रिषभ पंतला का दिली जात आहे जास्त संधी? वीवीएस लक्ष्मणने केला खुलासा