सन १९५२ मध्ये हेलसिंकी ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेणारे माजी भारतीय बॉक्सर शक्ती मजूमदार यांचे (२१ मे) निधन झाले आहे. हृद्यविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. ते ८९ वर्षांचे होते. त्यांच्या मृत्यूनंतर भारतीय बॉक्सिंगजगत शोकसागरात बुडाले आहे.
मजूमदार हे मागील काही काळापासून वयाशी संबंधित आजारांनी पिडीत होते. अखेर शुक्रवारी हृद्यविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. बेंगाल इमेच्योर बॉक्सिंग महासंघाचे अध्यक्ष असित बॅनर्जी यांनी मजूमदार यांच्या निधनानंतर दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी म्हटले की, “आम्हाला हे सांगताना अतिशय वाईट वाटत आहे की, शक्ती मजूमदार यांनी आज पश्चिम बंगाल येथील बालीगंज येथे अखेचरा श्वास घेतला आहे.”
साल १९५२ मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत वियतनामच्या गुयेन वान कुआकडून वॉकओव्हर प्राप्त केल्यानंतर मुजुमदार यांनी पुरुषांच्या फ्लाईवेट स्पर्धेतील पहिली फेरी जिंकली होती. परंतु दुसऱ्या फेरीत मात्र दक्षिण कोरियाच्या हान सू एनने त्यांना पराभूत केले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
सचिन तेंडुलकरने प्रचंड वेदनेत असून देखील खेळली होती ‘ती’ सिरीज, रॉबिन उथप्पाने केला खुलासा
बुढ्ढा होगा तेरा बाप! ४५ वर्षाच्या ‘या’ खेळाडूने पाडला १५ चौकार आणि १५ षटकारांचा पाऊस
टी२० विश्वचषकाचे यजमानपद भारत गमावणार? या देशात होऊ शकते आयोजन