भारत घरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध टी20 मालिका खेळणार आहे. 3 जानेवारी 2023 पासून खेळल्या जाणाऱ्या या मालिकेआधी मुंबईमध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) एक बैठक घेणार आहे. यामध्ये निवडकर्ते आणि संघाचे कर्णधार, प्रशिक्षक असणार आहेत. याचबरोबर राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीचे अध्यक्ष व्हीव्हीएस लक्ष्मण हे पण या बैठकीत उपस्थित असणार आहे. या बैठकीत भारताचा कर्णाधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांची चांगलीच कानउघाडणी होण्याची शक्यता आहे.
भारत यावर्षी सर्वाधिक सामने जिंकणारा संघ ठरला, मात्र एकही मोठी स्पर्धा संघाला जिंकता न आल्याने चाहत्यांची निराशा झाली. भारताने ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात दुबईमध्ये आशिया कप स्पर्धा खेळली. त्या स्पर्धेच्या सुपर 4 मध्ये भारताला पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्याकडून पराभव स्विकारावा लागला. त्यामुळे भारत या स्पर्धेच्या अंतिम फेरीतही पोहोचला नाही. त्यानंतर भारताला टी20 विश्वचषकातही निराशा हाती लागली.
ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत भारताने पहिल्याच सामन्यात पाकिस्तानवर रोमांचक विजय मिळवत चांगली सुरूवात केली होती. नंतर मात्र उपांत्य फेरीत इंग्लंडकडून 10 विकेट्सने हरला आणि स्पर्धेबाहेर झाला. या दोन्ही मोठ्या स्पर्धा भारताने गमावल्याने रोहित-राहुलला बैठकीत प्रश्नांना सामोरे जावे लागणार आहे.
भारताने 2013मध्ये शेवटची आयसीसी ट्रॉफी जिंकली. इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या त्या स्पर्धेत भारताचे नेतृत्व एमएस धोनी (MS Dhoni) याने केले होते. त्याआधी भारत 2011मध्ये घरच्या मैदानावर दुसऱ्यांदा वनडे विश्वचषक जिंकण्याची कामगिरी केली. 2013नंतर 2016 टी20 विश्वचषक, 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी, 2021 कसोटी चॅम्पियनशीप आणि 2021 टी20 विश्वचषक या स्पर्धांमध्ये भारताला अगदी जवळून पराभव पत्कारावा लागली. हा सर्व स्पर्धा भारताने विराट कोहली याच्या नेतृत्वाखाली गमावल्या होत्या. त्यामुळे निवडसमितीने रोहित-राहुलवर जबाबदारी दिली, मात्र त्यांनीही निराशा केली.
टी20 विश्वचषकात झालेल्या मोठ्या पराभवाने भारताची संपूर्ण निवडसमिती बरखास्त करण्यात आली. ज्याचे अध्यक्ष चेतन शर्मा होते. नव्या निवडकर्त्यांची निवड न झाल्याने शर्मांवर श्रीलंकेविरुद्ध संघ निवडण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
(Questions abound on Rohit Sharma and Rahul Dravid T20 world cup BCCI in action mode)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पत्रकाराने प्रश्न विचारताच बाबरला आला राग, ‘अशी’ दिली प्रतिक्रिया
भारताला 30 दिवसांत खेळायचेत तब्बल ‘इतके’ सामने, पहिल्या सामन्यात हार्दिक कॅप्टन