अफगाणिस्तानचा स्टार अष्टपैलू राशीद खानने (Rashid Khan) सांगितले की, तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय दरम्यान हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीशी झुंज देत सामना खेळला. यादरम्यान त्याने आफ्रिकन फलंदाजांचा धुव्वा उडवत 5 विकेट्स घेतल्या. अफगाणिस्तानने 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे. दक्षिण आफ्रिकेविरूद्धचा दुसरा एकदिवसीय सामना अफगाणिस्तानने 177 धावांनी जिंकला.
आयसीसी क्रमवारीत टाॅप-5 मध्ये असलेल्या संघाविरुद्धच्या पहिल्या मालिका विजयानंतर राशिद खान (Rashid Khan) म्हणाला, “बऱ्याच दिवसानंतर 5 विकेट्स घेतल्या. गेल्या एक महिन्यापासून मला माझ्या हॅमस्ट्रिंगमध्ये दुखापत झाली आहे, पण मला मैदानावर राहून संघाला मदत करायची होती. महत्त्वाची मालिका जिंकण्याची आमच्यासाठी मोठी संधी होती, त्यामुळे मला योगदान द्यायचे होते.”
पुढे बोलताना राशिद खान (Rashid Khan) म्हणाला, “युवा खेळाडूंसोबत गोलंदाजी करायला मला आवडते. मी माझा अनुभव त्यांच्याशी शेअर करतो आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ते ऐकतात आणि त्या गोष्टींमधून शिकतात. युवा खेळाडू पुढे येत आहेत आणि त्यांची प्रतिभा दाखवत आहेत हे खूप छान आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
रिषभ पंतच्या चेन्नई कसोटीतील शतकी खेळीनंतर प्रेयसीची रिऍक्शन व्हायरल
आधी नाबाद, मग बाद आणि पुन्हा नाबाद; पंचांच्या निर्णयामुळे भर सामन्यात उडाला गोंधळ
VIDEO: रूतुराज गायकवाड बनला ‘सुपरमॅन’ पकडला अप्रतिम झेल