भारत आणि इंग्लंड यांच्यात विश्वचषक 2023 मधील 29 वा सामना लखनऊच्या अटल बिहारी वाजपेयी स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित षटकात 9 विकेट्स गमावून 229 धावा केल्या. भारतीय संघाचा कर्णधार आणि अनुभवी फलंदाज रोहित शर्मासाठी हा सामना खूप खास ठरला आहे. खरंतर रोहित शर्माने 2023 मध्ये 1000 वनडे धावा पूर्ण केल्या आहेत. हिटमॅनने इंग्लंडविरुद्ध 87 धावांची खेळी खेळली आणि याच दरम्यान त्याने हे यश संपादन केले.
या वर्षी एकदिवसीय क्रिकेटमध्ये 1000 धावा पूर्ण करणारा रोहित शर्मा (Rohit Sharma) तिसरा फलंदाज ठरला आहे. त्याच्याआधी भारतीय संघाचा सलामीवीर शुभमन गिल (Shubhman Gill) याने यंदा ही कामगिरी केली होती. अशी कामगिरी करणारा श्रीलंकेचा युवा फलंदाज पाथुम निसांका (Pathum Nisanka) हा दुसरा फलंदाज ठरला.
भारतीय कर्णधाराची बॅट यंदा चांगली चालली आहे. त्याने एकदिवसीय सामन्यांमध्ये 55 पेक्षा जास्तीच्या सरासरीने धावा केल्या आहेत. या काळात त्याने 2 शतके आणि 8 अर्धशतकेही झळकावली आहेत. यावर्षी रोहित शर्माने आपल्या बॅटने भारतीय संघासाठी अनेक मॅचविनिंग खेळी खेळल्या आहेत.
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने सुरुवातीपासून एकापाठोपाठ एक विकेट्स गमावल्या, पण रोहित शर्माने एका बाजूने धावा काढल्या. आदिल रशीदविरुद्ध मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात त्याने 37व्या षटकात आपली विकेट गमावली. पण त्याआधी त्याने चांगली फलंदाजी केली. त्याने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील 54 वे अर्धशतक 66 चेंडूत पूर्ण केले आणि 87 धावांच्या खेळीत 10 चौकार आणि 3 षटकार मारले.
स्ट्राइक रेटच्या बाबतीत तो यावर्षी शुभमन गिल आणि पाथुम निसांका यांच्यापेक्षा सरस राहिला आहे. रोहितने आतापर्यंत 113.30 च्या जबरदस्त स्ट्राइक रेटने फलंदाजी केली आहे, तर गिलने 104.13 च्या स्ट्राइक रेटने आणि निसांकाने 87.62 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत. (Rohit became the third batsman to achieve this feat in 2023)
म्हत्वाच्या बातम्या
इंग्लंडविरुद्ध टीम इंडिया गडगडली! सूर्या-रोहितमुळे मारली 229 पर्यंत मजल