भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या मायदेशात परतला आहे. हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात भारतीय संघ वेस्ट इंडीज दौऱ्यात टी-20 मालिका खेळत आहे. पण रोहित या मालिकेचा भाग नसल्यामुळे मायदेशात परतला. वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-20 मालिकेत तिलक वर्मा या युवा फलंदाजाला पदार्पणाची संधी मिळाली. रोहित या मालिकेत खेळत नसला, तरी आयपीएलमध्ये तिलकसोबत खेळण्याचा त्याला अनुभव आहे. याच पार्श्वभूनीवर रोहित शर्माकडून तिलकचे कौतुक केले गेले.
इंडियन प्रीमियर लीग 2023 (IPL 2023) मधील आपल्या दमदार खेळीच्या जोरावर तिलक वर्मा (Tilak Verma) याने भारतीय संघात स्थान मिळवले. वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-20 मालिकेत त्याला पदार्पणाची संधी देखील मिळाली. आयपीएलमध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वात खेळातना कर्णधार आणि तिलक यांच्यात चर्चा होणे सहाजिक आहे. कर्णधार रोहितने हाच अनुभव माध्यमांसोबत शेअर केल्याचे दिसते. तिलक वर्माविषयी रोहित म्हणाला, “तो गुणवंत खेळाडू आहे. त्याच्यामध्ये भूक (धावा करण्यासाठीची) आहे, जी सर्वात महत्वाची गोष्ट ठरते. जेव्हा कधी त्याच्याशी चर्चा करतो, तेव्हा तो खूप परिपूर्ण वाटतो. चेंडू कधी मारायचा आणि कधी काय करायचे, याची चांगली माहिती त्याला आहे, असे जाणवते.”
आगामी आशिया चषक आणि वनडे विश्वचषकासाठी सर्व संघ तयारीला लागले आहेत. वनडे विश्वचषकाचे यजमानपद यावर्षी भारताकडे आहे. बीसीसीआय यासाठी कुठलीच कसर सोडताना दिसत नाहीये. कर्णधार रोहित देखील विश्वचषक उंचावण्यासाठी उत्सुक दिसत आहे. विश्वचषकाविषयी रोहित म्हणाला, “मी वनडे विश्वचषक कधीच जिंकलो नाहीये. हे माझे स्वप्न आहे. विश्वचषक तुम्हाला ताटात वाढून दिला जाणार नाहीये. यासाठी खरोखर परिश्रम घ्यावे लागतील. 2011 पासून आतापर्यंत आम्ही यासाठी प्रयत्न करत आहोत. यावेळीही आपल्याला यासाठी झगडावे लागणार आहे.”
(Rohit Sharma calls Tilak Verma talented, says ‘I have never won a World Cup…’)
महत्वाच्या बातम्या –
युवा फलंदाजाचा अश्विन आणि वसीम जाफरवर प्रभाव, दिग्गजांची विश्वचषकासाठी थेट निवडकर्त्यांकडे मागणी
बोल्टचे मोठ्या काळानंतर संघात पुनरागमन! वाचा 11 महिन्यांनंतर देशासाठी खेळताना गोलंदाजाला काय वाटते