भारताचा मधल्या फळीतला फलंदाज लोकेश राहुल गेल्या काही काळपासून सातत्याने चांगली कामगिरी करत आहे.
राहुलने आयर्लंड आणि इंग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस येत चांगली कामगिरी केली आहे.
गुरवारपासून (१२ जुलै) भारताची इंग्लंड विरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरु होत आहे.
त्यामुळे आता तिसऱ्या क्रमांकावर नियमित फलंदाजी करत असलेल्या विराट कोहलीच्या फलंदाजीतील क्रमवारीवरुन भारतीय संघ व्यवस्थापनाची दमछाक होणार आहे.
गुरवारी (१२ जुलै) नॉटिघंम भारताचा इंग्लंड विरुद्ध पहिला एकदिवसीय सामना होणार आहे. त्याच्या पूर्व संध्येला भारताचा उपकर्णधार रोहित शर्माची पत्रकार परिषद झाली.
त्यामध्ये लोकेश राहुल आणि विराटच्या फलंदाजी क्रमवारीबाबत प्रश्न विचारला असता रोहितने या प्रश्नाचा चेंडू कोहलीच्या कोर्टात लगावला.
“लोकेश राहुल कोणत्या क्रमांकावर फलंदाजीस येणार याबाबत मला काही कल्पना नाही. याविषयीचा सर्व निर्णय कर्णधार कोहली घेईल.” फलंदाजीतील क्रमवारी बाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रोहित म्हणाला.
“राहुल हा उत्कृष्ठ फलंदाज आहे. गेल्या काही काळपासून तो सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळे त्याने कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी केली तरी त्याची कामगिरी प्रभावीच राहिल.” पुढे राहुलचे कौतुक करताना रोहित शर्मा असे म्हणाला.
तसेच या पत्रकार परिषदेत रोहित शर्माने कुलदीप यादवचे कौतुक करत त्याच्या इंग्लंड दौऱ्यातील भूमिकेविषयी सुद्धा वक्तव्य केले.
“कुलदीप आमच्यासाठी एक आक्रमक पर्याय आहे. गेल्या काळात त्याने टी-२० आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. माला आशा आहे, दक्षिण आफ्रिकेप्रमाणे इंग्लंडमध्ये देखिल कुलदीप चांगली कामगिरी करेल.”
आजपासून भारतीय संघ इंग्लंड विरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे.
या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना गुरवारी (१२ जुलै) नॉटिघंम येथिल ट्रेंट ब्रीज क्रिकेट मैदानावर होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-सतत पराभूत होत असलेल्या टीम आॅस्ट्रेलियाबद्दल रिकी पॉन्टींगचे मोठे भाष्य
-एमएस धोनी म्हणतो, 300 एकदिवसीय सामने खेळलोय; मी वेडा आहे का?