भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सध्या ५ सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथा सामना अमेरिकेतील फ्लोरिडा येथे खेळवला गेला. या सामन्यात भारतीय संघाने एकतर्फी विजय मिळवत मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेतली आहे. मात्र, या सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्माने सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकांना एक विशेष भेट देत उपस्थितांची मने जिंकली.
Thanking fans & appreciating their support – Captain @ImRo45 way! 😊 👏
🎥 Scenes after #TeamIndia's win in the 4⃣th #WIvIND T20I in Florida. 👍 👍 pic.twitter.com/XzORF1rCUc
— BCCI (@BCCI) August 7, 2022
भारताने वेस्ट इंडिजचा या सामन्यात ५९ धावांनी पराभव करत एक मोठा विजय साध्य केला. या विजयासह भारताने ५ टी-२० सामन्यांची मालिकाही खेशात घातली. या सामन्यानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्माने ड्रेसिंग रूममध्ये जाण्यापूर्वी थेट प्रेक्षकांकडे गेला. उपस्तित प्रेक्षक आणि रोहित शर्माचे चाहते या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते. त्यानंतर रोहितने संपूर्ण मैदानाला फेरी मारत प्रत्येक प्रेक्षकाशी हात मिळवणी केली.
Fans were so eager to give @ImRo45 a high five after @BCCI India's win over @windiescricket in Florida today that a small crush of fans fell through a barricade in the west side grandstand. They were too happy to be hurt. pic.twitter.com/fLyyZdjM3k
— Peter Della Penna (@PeterDellaPenna) August 6, 2022
दरम्यान, चोथअया टी-२० सामन्यात कर्णधार रोहितने सलामीला फलंदाजीला येत १६ चेंडूत ३३ धावांची छोटेखानी पण उपयुक्त अशी खेळी केली. या खेळीदरम्यान रोहितने २ चौकार आणि ३ षटकार मारले. ओबेड मॅकॉयच्या तिसऱ्या षटकात त्याने हे तिनही षटकार खेचले. या ३ षटकारांसह रोहित आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा जगातील दुसरा फलंदाज बनला आहे. त्याने ४७७ षटाकारांचा आकडा गाठला आहे. रोहितचे कसोटी क्रिकेटमध्ये ६४, वनडे क्रिकेटमध्ये २५० आणि टी२० क्रिकेटमध्ये १६३ असे मिळून ४७७ षटकार झाले आहेत. शिवाय त्याने या सामन्यात १६ हजार आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा देखील पार केला आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
भारतीय खेळाडूचा झेल सोडल्याने वाद घालणं आलं अंगलट, इंग्लंडच्या खेळाडूला आयसीसीकडून शिक्षा
धोनी, विराटला न जमलेला ‘हा’ विक्रम रचलाय कॅप्टन रोहितने, वाचा सविस्तर
हर्षल पटेल आशिया चषक खेळणार नाही! भारतीय संघाबाबत मोठी बातमी आली समोर