युवेंट्सचा स्टार फुटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डोचे बॅलोन द ओर या फुटबॉलमधील प्रतिष्ठित पुरस्काराच्या नामांकनाच्या पहिल्या पंधरा जणांच्या यादीत समावेश झाला आहे.
मात्र या पुरस्कार नामांकनाच्या यादीत अर्जेंटिना आणि बार्सिलोना स्टार लियोनल मेस्सीचे नाव नाही. त्याने पाच वेळा हा पुरस्कार जिंकला असून कदाचित त्याचे नाव 30 जणांच्या यादीत येऊ शकते.
सध्या सुरू असलेल्या ला लीगमध्ये मेस्सीने वॅलेंसिया विरुद्ध गोल करत या वर्षातील त्याचा 41वा गोल नोंदवला. तसेच त्याने सलग दहा वर्षामध्ये 40 गोल करण्याची कामगिरी केली आहे.
मागील दोन पुरस्कार विजेते असणाऱ्या पोर्तुगीज खेळाडू रोनाल्डोने हा पुरस्कार एकूण पाच वेळा पटकावला आहे. रोनाल्डोच्या नावाचा सहभाग हा त्याने मागील आठवड्यात बलात्काराचे आरोप फेटाळल्यावर करण्यात आला.
फ्रान्स फुटबॉल मॅगझिनकडून हा पुरस्कार दिला जातो. 1956ला पहिल्यांदा हा पुरस्कार देण्यात आला. तर यावर्षी पहिल्यांदाच महिला फुटबॉलपटूलाही हा पुरस्कार दिला जाणार आहे.
नामांकन मिळालेले खेळाडू-
सर्जियो अग्युरो (अर्जेंटिना, मॅंचेस्टर सिटी)
अॅलिसन बेकर (ब्राझिल, लीव्हरपूल)
गॅरेथ बॅले (वेल्स, रियल माद्रीद)
करिम बेनझेमा (फ्रान्स, रियल माद्रीद)
एडिसन कवानी (उरुग्वे, पॅरिस सेंट जर्मेन)
थिबाउ कोर्टवा (बेल्जियम, रियल माद्रीद)
क्रिस्तियानो रोनाल्डो (पोर्तुगल, युवेंट्स)
केविन डी ब्रुने (बेल्जियम, मॅंचेस्टर सिटी)
रोबेर्तो फिरमिनो (ब्राझिल, लीव्हरपूल)
दिएगो गोडिन (उरुग्वे, अॅटलेटिको माद्रीद)
अॅटोनियो ग्रीझमन (फ्रान्स, अॅटलेटिको माद्रीद)
हॅरी केन (इंग्लंड, टोटेनहॅम हॉट्स्पर)
एडन हजार्ड (बेल्जियम, चेल्सी)
एनगोलो कांटे (फ्रान्स, चेल्सी)
इस्को (स्पेन, रियल माद्रीद)
महत्त्वाच्या बातम्या-
–कायलिन एमबाप्पेने ४५ वर्षांपुर्वीचा फुटबाॅलमधील विक्रम मोडला
–PBL 2018: प्रीमियर बॅडमिंटन लीगमध्ये भारतीय खेळाडू मालामाल
–…तरच भारतीय संघ आयसीसी क्रमवारीत वन-डेत येणार अव्वल स्थानी