भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान सुरू असलेल्या कसोटी मालिकेत दोन्ही ही संघ १-१ ने बरोबरीत आहेत. पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाने भारतीय संघावर २२७ धावांनी विजय मिळवला होता; तर दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने चोख प्रत्युत्तर देत इंग्लंड संघावर ३१७ धावांनी विजय मिळवला. त्यानंतर अखेरचे २ कसोटी सामना व्हायचे बाकी आहेत. अशातच ४ मार्च पासून सुरू होणाऱ्या चौथ्या आणि अंतिम कसोटी सामन्यासाठी इंग्लंड संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू उपलब्ध नसणार आहे.
पहिल्या दोन कसोटी सामन्यात दोन्ही संघांना एक-एक विजय मिळवण्यात यश आले आहे. त्यामुळे योजनेनुसार युवा अष्टपैलू खेळाडू सॅम करन याला चौथ्या आणि मालिकेतील अंतिम सामन्यासाठी बोलावण्यात येणार होते. परंतु कोरोना महामारीमुळे प्रवासावर लावण्यात आलेल्या प्रतिबंधांमुळे इंग्लंड संघ व्यवस्थापनाला त्याला चौथ्या सामन्यात न खेळवण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे.
म्हणून सॅम करन आता २६ फेब्रुवारी रोजी आगामी टी२० मालिकेसाठी उड्डाण भरणाऱ्या संघासोबत भारतात येणार आहे. कसोटी मालिकेच्या समाप्तीनंतर १२ मार्चपासून दोन्ही संघांमध्ये ५ सामन्यांची टी२० मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेतील पाचही सामने अहमदाबाद स्थित मोटेरा स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. हे सामने १२, १४, १६, १८, २० मार्च रोजी खेळवण्यात येणार आहे.
सॅम करन याची कामगिरी
इंग्लंड संघाचा युवा अष्टपैलू खेळाडू सॅम करन याने आपल्या कारकिर्दीत एकूण २१ कसोटी सामने खेळले आहेत. यात २५.६ च्या सरासरीने ७४१ धावा केल्या आहेत. यात ३ अर्धशतकांचा समावेश आहे आणि गोलंदाजी करतांना त्याच्या नावे ४४ विकेट्स आहेत. तसेच ५ एकदिवसीय सामन्यात त्याने २५ धावा केल्या आहेत. आणि ५ गडी बाद करण्यात त्याला यश आले आहे. तसेच त्याने खेळलेल्या ८ टी -२० आंतरराष्ट्रीय सामन्यात ४३ धावा केल्या आहेत आणि ९ गडी देखील बाद केले आहेत.
तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडचा संघ: जो रूट (कर्णधार) जेम्स एंडरसन, जोफ्रा आर्चर, जॉनी बेयरस्टो, डोमिनिक बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रॉरी बर्न्स, जैक क्रॉली, बेन फॉक्स, डैन लॉरेन्स, जैक लीच, ओली पोप, डोम सिब्ली, बेन स्टोक्स, ओली स्टोन, क्रिस वोक्स, मार्क वुड
इंग्लंडचा टी२० संघ: ऑयन मोर्गन (कर्णधार), मोईल अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेयरस्टो, सॅम बिलिंग्स, जोस बटलर, सॅम करन, टॉम करन, क्रिस जार्डन, लियाम लिविंगस्टोन, डेविड मलान, आदिल रशीद, जेसन रॉय, बेन स्टोक्स, रिसी टोपले आणि मार्क वुड
महत्त्वाच्या बातम्या-
दुर्दैवच म्हणायचं अजून काय! ५ स्टार क्रिकेटपटू, ज्यांना लिलावात कुणीही मिळाला नाही खरेदीदार
संपूर्ण यादी : आयपीएल २०२१ लिलावानंतर ‘असे’ आहेत सर्व ८ संघांचे खेळाडू
मॅक्सवेलला १४.२५ कोटींची बोली लागल्यानंतर वीरेंद्र सेहवागने शेअर केला ‘हा’ व्हिडिओ