भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यानच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला गेला. या कसोटीत कर्णधार रूटच्या शानदार द्विशतकी खेळीच्या आणि गोलंदाजांच्या सर्वोत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर इंग्लड संघाने भारतीय संघाला २२७ धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत केले.
पहिल्या कसोटीत भारतीय संघाने गोलंदाजी, फलंदाजी तसेच क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागांमध्ये सरासरी कामगिरी केली. यानंतर, संघ व्यवस्थापन शेवटच्या २ कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघात काही बदल करण्याचा, अंदाज वर्तविला जात आहे. आज आपण अशा तीन खेळाडूंविषयी जाणून घेऊया, जे अहमदाबाद येथे होणाऱ्या अखेरच्या दोन कसोटींसाठी भारतीय संघात निवडले जाऊ शकतात.
१) मोहम्मद शमी
भारतीय संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीच्या भारतीय संघात समाविष्ट होता. मात्र, पहिल्या कसोटीत फलंदाजी करत असताना पॅट कमिन्सचा चेंडू अंगठ्यावर लागल्याने, तो उर्वरित मालिकेतून बाहेर पडला होता. शमी सध्या या दुखापतीतून सावरताना दिसत आहे.
दुखापतीमुळे शमीचा इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या दोन कसोटीसाठीच्या भारतीय संघात समावेश करण्यात आला नव्हता. परंतु, आता त्याने सराव करायला सुरुवात केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने आपण तंदुरुस्त होत असल्याचे संकेत दिले आहे. त्यामुळे, कसोटी मालिकेतील अखेरच्या दोन सामन्यांसाठी त्याचा भारतीय संघात समावेश होऊ शकतो.
२) उमेश यादव
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर मोहम्मद शमी दुखापतग्रस्त झाल्यानंतर भारतीय संघ व्यवस्थापनाने अनुभवी वेगवान गोलंदाज उमेश यादव यांना संधी दिली होती. मेलबर्न येथे झालेल्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात तो एकच बळी मिळवू शकला. त्याच सामन्यात क्षेत्ररक्षण करताना त्याला दुखापत झाली व उर्वरित मालिकेतून बाहेर गेला.
भारतासाठी आत्तापर्यंत ४८ कसोटी सामने खेळताना उमेशने १४८ बळी मिळवले आहेत. उमेशला भारतीय खेळपट्ट्यांवरचा उत्तम गोलंदाज मानले जाते. त्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापन इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या दोन कसोटींसाठी उमेशला संघात स्थान देऊ शकते.
३) हनुमा विहारी
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील पहिल्या दोन कसोटीत सरासरी कामगिरी केल्याने हनुमा विहारीवर अनेकांनी टीका केली होती. मात्र, सिडनी कसोटीत धैर्यपूर्ण फलंदाजी करत, रविचंद्रन अश्विनसोबत नाबाद भागीदारी करून त्याने ही कसोटी ऐतिहासिक रीतीने ड्रॉ करण्यात सिंहाचा वाटा उचलला. याच खेळीदरम्यान त्याला दुखापत झाली.
सिडनी कसोटीतील दुखापतीमुळे त्याला इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या दोन कसोटीसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आलेले नाही. मात्र, विहारीने सोशल मीडियावरून आपल्या ट्रेनिंगचा एक व्हिडिओ नुकताच सार्वजनिक केला आहे. तिसऱ्या कसोटीपूर्वी तो पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यास, अहमदाबाद येथील अखेरच्या दोन कसोटीसाठी संघात स्थान देण्यात येईल.
महत्वाच्या बातम्या:
चेन्नई कसोटीत रहाणेचा ‘बदक’, सेहवाग-मुरलीला पछाडत लाजिरवाण्या विक्रमात मिळवलं अव्वलस्थानी
दक्षिण आफ्रिकेत जन्माला येतोय नवा एबी डिविलियर्स, पाहा कशी करतोय गोलंदाजांची ३६० डिग्री धुलाई
दुसर्या कसोटीतून रोहित, रहाणेसह ‘हा’ खेळाडू होणार ‘आउट’? कर्णधार कोहली कठोर निर्णय घेण्याची शक्यता