भारत आणि पाकिस्तान (INDvPAK) यांच्या दरम्यान नुकताच टी20 विश्वचषकात (2022 T20 World Cup) सामना पार पडला. भारतीय संघाने शानदार कामगिरी करत पाकिस्तानला पराभूत केले. मागील विश्वचषकात मिळालेल्या पराभवाचा बदला भारतीय संघाने यासोबत घेतला. भारताच्या या विजयाचा नायक ठरलेल्या विराट कोहली (Virat Kohli) याचे सर्वत्र कौतुक होताना दिसतेय. मात्र, पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर (Shoaib Akhtar) याने जगावेगळेच वक्तव्य केले आहे.
भारताच्या विजयानंतर अख्तर हा स्वतःच्या यूट्यूब चॅनलवर व्यक्त झाला. यादरम्यान त्याने दोन्ही संघांचे कौतुक केले. मात्र, त्याने विराट कोहली याच्याबद्दल एक अक्षय पाहिजे वक्तव्य देखील केलेले पाहायला मिळते. अख्तर म्हणाला,
“मला वाटते की आता विराटने टी20 क्रिकेटमधून निवृत्त व्हायला हवे. त्याने आपली सर्व ऊर्जा टी20 क्रिकेटमध्ये वाया घालवू नये. त्याने ज्या प्रकारची ऊर्जा पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात दाखवली तशी ऊर्जा त्याने वनडेत दाखवली तर तो तीन शतके ठोकू शकतो.”
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ अडचणीत असताना विराटने एक शानदार खेळी करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या विराटने अखेरपर्यंत नाबाद राहत 53 चेंडूंचा सामना करताना नाबाद 82 धावांची खेळी केली. यामध्ये सहा चौकार व चार षटकारांचा समावेश होता.
विराट कोहली सप्टेंबर महिन्यात झालेल्या आशिया चषकापर्यंत चांगल्या फॉर्ममध्ये दिसत नव्हता. मात्र, त्याने या स्पर्धेत उत्कृष्ट खेळ दाखवला. या स्पर्धेत त्याने अफगाणिस्तानविरुद्ध आपले बहुप्रतीक्षित 71 वे शतक पूर्ण केले होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
मार्कसने कस के मारा! पाहा 18 चेंडूवर कशी केली षटकार-चौकारांची बरसात
विराटच्या यशाने शास्त्रींचा आनंद गगनात मावेना; म्हणाले, “त्याने आता सर्वांची…”
पाकिस्तानला धूळ चारून भारतीय संघ सिडनीत दाखल, नेदरलंडसोबत खेळायचा आहे पुढचा सामना