भारतीय कसोटी संघात मोहम्मद सिराज आणि हनुमा विहारी यांचा समावेश होता. अंतिम अकरात मात्र त्यांना संघात स्थान देण्यात आले नव्हते. त्यामुळे त्यांना विजय हजारे ट्राॅफीतील बाद फेरीत खेळण्यासाठी जाण्याची परवानगी देण्यात आल्याने युवा खेळाडू शुबमन गिल आणि मनिष पांडे यांना भारतीय संघात बोलवण्यात आले आहे.
शुबमन गिल शनिवारी(13 आॅक्टोबर) सांयकाळी सराव करून घरी आला होता. तेव्हाच त्याला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून फोन करून भारतीय संघात सामील व्हायला सांगितले होते.
या युवा खेळाडूला पहिल्यांदा ह्या गोष्टीवर विश्वासच बसला नाही. हनुमा विहारीच्या जागी त्याला स्थान देण्यात आल्याचे कळल्यानंतर त्याचा आनंद गगनात मावत नव्हता.
“मला खुप आनंद झाला आहे. भारतीय संघात स्थान मिळणे ही खुप मोठी गोष्ट आहे. मला भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंकडून खुप शिकायला मिळेल अशी आशा आहे.” अशा शब्दात शुबमनने आपल्या भावना व्यक्त केल्या.
2017 साली भारतीय अंडर-19 संघाने जिंकलेल्या विश्वचषक स्पर्धेत शुबमनने महत्वाची भुमिका निभावली होती. शुबमन भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचा चाहता आहे. शुबमनला विराट सारखीच कामगिरी करायची आहे. विजय हजारे ट्राॅफीत पंजाबकडून खेळताना शुबमनने दमदार कामगिरी केली आहे.
मोहम्मद सिराजला देखील विजय हजारे ट्राॅफीतील बाद फेरीचे सामने खेळण्यासाठी पाठवण्यात आले आहे. त्याच्या जागी मनिष पांडेला संधी देण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या-
- Video: विराट कोहली आणि कंपनीने तीव्र उन्हापासून बचावासाठी घेतला ‘आईस बाथचा’ आनंद
- अबब! अफगाणिस्तानच्या युवा खेळाडूने मारले एकाच ओवरमध्ये 6 षटकार
- आॅस्ट्रेलिया दौऱ्यासाठी पंत की साहा, निवड समितीसमोर मोठा पेचप्रसंग