इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील लॉर्ड्स कसोटी चांगलीच चर्चेत राहिली. ऑस्ट्रेलियाने हा सामना 43 धावांनी जिंकला आणि ऍशेस मालिकेत 0-2 अशी आघाडी घेतली. या सामन्यात इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टो याच्या विकेटमुळे चांगलाच वाद पेटला. याच पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एलिट पॅनलचे माजी पंच सायमन टॉफेल यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
ऐतिहासिक लॉर्ड्स कसोटीत (Lord’s Test) शेवटच्या डावात इंग्लंड संघ 371 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी खेळपट्टीवर आला. इंग्लंडलने सुरुवातीच्या विकेट्स झटपट गमावल्यानंतर जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) मोठी खेळी करेल, असे दिसत होते. मात्र, त्यानेही अगदी नाटकीय पद्धतीने विकेट गमावली. बेअरस्टो आपल्या सहकारी खेळाडूशी बोलण्यासाठी क्रिजवर पाय टेकवून तत्काल पुढे निघून आला. पण तितक्यात यष्टीरक्षक ऍलेक्स केरीने स्टिंपिंग करून विकेटसाठी अपील केली. पंचांनीही बेअरस्टो बाद असल्याचे मान्य केले. नियमानुसार बेअरस्टो बाद होता. पण क्रिकेटचे जाणकार आणि माजी दिग्गज यांच्या मते ही विकेट खेळाडू वृत्तीच्या विरोधात जाते.
याच पार्श्वभूमीवर दिग्गज पंच सायमन टॉफेल (Simon Taufel) यांनी परखड मत मांडले. टॉफेल यांच्या मते जेव्हा खेळाडू क्रिकेट नियमानुसार बाद असतात, पण त्यांना ही गोष्ट आवडत नाही, तेव्हाच खेळाडू वृत्तीविषयी बोलले जाते. टॉफेल म्हणाले, “माझा अनुभव असा आहे की, जेव्हा क्रिकेटच्या नियमनानुसार बाद दिले जाते आणि त्यांना ही बाब आवडत नाही, तेव्हा त्यांच्याकडून खेळाडू वृत्तीचा हवाला दिला जातो.” दरम्यान, बेअरस्टोच्या या विकेटमुळे क्रिकेटजगतात चांगलीच चर्चा झाली. काहींच्या मते बेअरस्टो बाद होता, तर काहींच्या मते हा निर्णय योग्य नव्हता. इंग्लंड संघासाठी शेवटच्या डावात ही विकेट चांगलीच महागात पडली.
ऍशेस 2023चा विचार केला, तर पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ 2 विकेट्सने, तर दुसऱ्या सामन्यात 43 धावांनी विजय मिळवली. मालिकेतील तिसरा सामना गुरुवारी (6 जुलै) हेडिंग्ले स्टेडियवर सुरू होणार असून ही लढत निर्णायक ठरू शकते. स्टीव स्मिथ याच्या कसोटी कारकिर्दीतील हा 100वा सामना आहे. अशात स्मिथ पुन्हा एकदा मोठी खेळी करून आपल्या संघाला ऍशेस 2023ची ट्रॉफी जिंकण्यासाठी मदत करू शकतो. (Simon Taufel took aim at England supporters after Jonny Bairstow’s wicket dispute)
महत्वाच्या बातम्या –
तिसऱ्या कसोटी आधीच कमिन्सने उडवला धुरळा! इंग्लंडला आव्हान देत म्हणाला, “आम्ही पुन्हा…”
दोन महिन्यातच खरी ठरली रोहितची भविष्यवाणी! वेस्ट इंडिजमध्ये तिलक वर्मा दिसणार ब्ल्यू जर्सीत