भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) हा आधुनिक क्रिकेटचा महान खेळाडू मानला जातो. त्याचवेळी, कसोटी क्रिकेटचा विचार केला तर, सध्या जो रूटचे (Joe Root) नाव आघाडीवर आहे. रुट कसोटीत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही मोडू शकतो, असे मानले जात आहे. या दरम्यान भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) एक मोठी भविष्यवाणी केली आहे. भविष्यात सर्वोत्तम कसोटीपटू बनू शकणाऱ्या खेळाडूचे नाव त्याने दिले आहे.
भारताचा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतचा (Rishabh Pant) कसोटी क्रिकेटमधील सर्वकालीन महान खेळाडूंमध्ये समावेश होऊ शकतो, असा अंदाज सौरव गांगुलीने व्यक्त केला आहे. एका कार्यक्रमादरम्यान गांगुली म्हणाला, “मी रिषभ पंतला भारतातील सर्वोत्तम कसोटी फलंदाजांपैकी एक मानतो. त्याच्या कसोटी क्रिकेटमधील पुनरागमनाचे मला आश्चर्य वाटले नाही. तो भारताकडून कसोटी क्रिकेट खेळत राहणार आहे. अशीच कामगिरी करत राहिल्यास कसोटी क्रिकेटमधील सर्वकालीन महान खेळाडूंमध्ये त्याचा समावेश होईल. मला विश्वास आहे की, त्याला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करण्याची गरज आहे. तो प्रतिभावान आहे आणि मला खात्री आहे की तो लवकरच असे करण्यात यशस्वी होईल.”
डिसेंबर 2022 मध्ये कार अपघातात जखमी झाल्यानंतर पंतचा प्रथमच भारतीय कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. बांगलादेशविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेसाठी त्याची संघात निवड झाली आहे. त्याचवेळी, बांगलादेशविरुद्ध चेन्नई येथे 19 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी त्याला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळण्याची पूर्ण शक्यता आहे.
बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, सर्फराज खान, ध्रुव जुरेल, रिषभ पंत, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाश दीप व यश दयाल.
हेही वाचा-
उपकर्णधारापासून ‘द वॉल’पर्यंत, या दिग्गजांसाठी टीम इंडियाचे दरवाजे कायमचे बंद!
एमएस धोनीचा वीस वर्षे जुना विक्रम थोडक्यात हुकला; या खेळाडूने केली बरोबरी
जसप्रीत बुमराहसोबत अन्याय झाला? संघातील हे महत्त्वाचं पद गेलं, बीसीसीआयच्या निर्णयामुळे खळबळ