सध्या वेस्ट इंडिजमध्ये आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेचा थरार सुरू आहे. या स्पर्धेत आतापर्यंत युवा खेळाडूंचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. काही खेळाडू आहेत, ज्यांनी या स्पर्धेत भरपूर नाव कमवले आहे, ज्यामध्ये ‘बेबी एबी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवाल्ड ब्रेविस (Dewald Brevis) आणि भारतीय वेगवान गोलंदाज रवी कुमार यांचा समावेश आहे. दरम्यान, आणखी एक नाव समोर येत आहे, जे सध्या प्रचंड चर्चेत आहे.
सध्या चर्चेत असलेला गोलंदाज दुसरा तिसरा कोणी नसून दक्षिण आफ्रिका संघातील १५ वर्षीय गोलंदाज क्वेना मफाका (Kwena Maphaka) आहे. या १५ वर्षीय गोलंदाजाने आपल्या वेगवान आणि अचूक टप्प्याच्या गोलंदाजीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. त्याने ३० जानेवारी रोजी श्रीलंका संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात आपल्या गोलंदाजीने श्रीलंका संघातील फलंदाजांना अडचणीत टाकले होते. त्याने १० षटकात ६० धावा खर्च करत ३ गडी बाद केले होते. (Kwena Maphaka bowling)
आयसीसीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये हा १५ वर्षीय गोलंदाज आपला जलवा दाखवताना दिसून येत आहे. या व्हिडिओमध्ये तो आपल्या वेगवान गोलंदाजीने फलंदाजाला अडचणीत टाकताना दिसून येत आहे. डाव्या हाताचा फलंदाज असो किंवा उजव्या हाताचा, हा गोलंदाज अचूक टप्प्याची गोलंदाजी करताना दिसून येत आहे. या व्हिडिओवर चाहते देखील आपल्या प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत.
https://www.instagram.com/reel/CZY7dKeoMSr/?utm_medium=copy_link
या गोलंदाजाला पाहून अनेकांनी त्याला ‘ज्युनियर रबाडा’ असे म्हटले आहे. तर अनेकांना रबाडा गोलंदाजी करण्यासाठी आल्यासारखे वाटत आहे. तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, या सामन्यात श्रीलंका संघाने दक्षिण आफ्रिका संघाला ६५ धावांनी पराभूत केले. श्रीलंका संघाने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद २३२ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका संघाचा डाव अवघ्या १६७ धावांवर संपुष्टात आला होता.
महत्वाच्या बातम्या :
हार्दिक पंड्याच्या ‘त्या’ व्यक्तव्यांनी निवडकर्त्यांनाच ठरवले खोटे? वाचा सविस्तर
हेलिकॉप्टर शॉट मारण्यात अफगाणिस्तानचा ‘या’ फलंदाजाची धोनीलाही टक्कर, पाहा व्हिडिओ
U19 World Cup: ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या सेमीफायनलपूर्वी भारतीय संघाला मिळाली ‘ही’ गुड न्यूज