पुणे, १७ फेब्रु.२२: महाराष्ट्र ज्यूदो असोसिएशनच्या वतीने आयोजित ४८ व्या राज्यस्तरीय वरिष्ठ गट (पुरुष व महिला) स्पर्धेत ६६ किलो खालील गटात नाशिकचा आंतरराष्ट्रीय खेळाडू अजिंक्य वैद्यने कोल्हापूरच्या अवधून पाटीलचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. पुणे जिल्हा ज्युदो असोसिएशन (पीडीजेए) संघाच्या अजिंक्य मते व अमरावतीच्या केशव लोकनाथला कास्यपदकावर समाधान मानावे लगले.
म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये आज पासून सुरू झालेल्या या स्पर्धेत पुरूषांच्या ६६ किलो खालील गटात नाशिकचा आंतरराष्ट्रीय खेळाडू अजिंक्य वैद्यने अवघ्या ३५ सेकंदात को सोटो गाके डाव टाकून पूर्ण १ गुणाने (इप्पोन) कोल्हापूरच्या अैधूत पाटीलचा पराभव करून सुवर्णपदकावर आपला हक्क प्रस्तापित केला.
अजिंक्य वैद्यने २०१८ मध्ये जयपूर येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत ज्युनिअर गटात रौप्यपदक जिंकले होते. पीडीजेए संघाच्या अजिंक्य मते व अमरावतीच्या केशव लोकनाथला कास्यपदकावर समाधान मानावे लगले.
तत्पूर्वी, श्री महाबली हनुमान, जागतिक ज्युदोचे प्रणेते डॉ. जिगोरो कोनो तसेच भारतीय ज्युदोचे आद्यसंस्थापक रघुनाथ खाणिवाले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व मॅटचे पूजन करून स्पर्धेचे उद््घाटन करण्यात आले. यावेळी राज्य संघटनेचे महासचिव श्री शैलेश टिळक, तांत्रिक समिती अध्यक्ष श्री रवी पाटील, तांत्रिक समितीचे सचिव श्री दत्ता आफळे, स्पर्धा निरीक्षक श्री अनिल सपकाळ व स्पर्धा संचालक श्री दिपक होले उपस्थित होते.