भारताचा मधल्या फळीतील फलंदाज सुरेश रैना हा एक उत्तम क्षेत्ररक्षक म्हणूनही ओळखला जातो. त्याने अनेकदा त्याच्या अफलातून क्षेत्ररक्षणाने आश्चर्यचकित केले आहे. त्याच्याबरोबरच सध्याच्या भारतीय संघात विराट कोहली, रविंद्र जडेजा असे काही खेळाडू आहेत, ज्यांची नावे सध्याच्या आघाडीच्या क्षेत्ररक्षकांमध्ये घेतली जातात.
मात्र रैनाने नुकतचे स्पोर्ट्सस्क्रिनशी बोलताना भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेला सध्याच्या भारतीय संघातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हटले आहे.
रैना म्हणाला, ‘अजिंक्य रहाणेकडे चांगले झेल घेण्याचे तंत्र आहे. क्षेत्ररक्षण करताना मला त्याचे स्थान आवडते. त्याच्याकडे वेगळ्या प्रकारची ताकद आहे. तो जेव्हा हलतो, तेव्हा त्याचे शरीर वाकू शकते, बाकीच्यांपेक्षा हे वेगळेपण त्याच्याकडे आहे.’
रहाणे बऱ्याचदा क्षेत्ररक्षणावेळी स्लीपला उभा असलेला दिसतो. रैनाही त्याच्या स्लीपला घेतलेल्या झेलांचा चाहता आहे. रैनाने रहाणेच्या स्लीपला उभे राहुन केलेल्या क्षेत्ररक्षणाचे कौतुक केले आहे.
तो म्हणाला, ‘रहाणे खूप चांगला स्लीपचा क्षेत्ररक्षक आहे. तो मागून फलंदाजाच्या हालचालींचा अंदाज घेत असतो, जे की खूप महत्त्वाचे असते, कारण स्लीपच्या क्षेत्ररक्षकामध्ये आणि फलंदाजामध्ये जास्त अंतर नसते. तो त्याचप्रकारे सराव करतो, ज्यामुळे त्याला सामन्यादरम्यान सर्व सोपे जाते.’
रहाणेच्या नावावर एका कसोटी सामन्यात क्षेत्ररक्षक म्हणून सर्वाधिक झेल घेण्याचा विश्वविक्रमही आहे. त्याने श्रीलंका विरुद्ध गाले येथे २०१५ ला झालेल्या कसोटी सामन्यात ८ झेल घेतले होते.
ट्रेंडिंग घडामोडी –
क्रिकेटमधील ‘ही’ गोष्ट आमच्यासाठी असेल सर्वात कठीण काम
बापरे! सामन्यात तब्बल ८ षटकार ठोकूनही संघ झाला पराभूत…
विंसी प्रीमियर लीगमध्ये ‘या’ संघाने केवळ ३ सामने खेळत पटकाविला अव्वल क्रमांक…