प्रतिष्ठित इंडियन प्रीमियर २०२०चे बिगुल वाजण्यापूर्वी माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैनाने अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. स्वातंत्र्यदिनी रैनाने केलेल्या या अनपेक्षित घोषणेमुळे क्रिकेटविश्व हादरुन गेले होते. परंतु आयपीएल २०२०मध्ये तरी रैनाची खेळी पाहायला मिळेल, अशी चाहत्यांना अपेक्षा होती. मात्र, वैयक्तिक कारणामुळे रैनाने आयपीएलमधून माघार घेतल्याने तेही अशक्य झाले. पण आता हाच खेळाडू लवकरच मैदानावर आपल्या फलंदाजीचा जलवा दाखवताना दिसणार आहे.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत खेळणार
नुकत्याच बीसीसीआयने भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात रोमांचक सय्यद मुश्ताक अली टी२० स्पर्धेच्या तारखा घोषित केल्या आहेत. १० जानेवारी ते ३१ जानेवारी २०२१ दरम्यान ही स्पर्धा रंगणार आहे. ६ वेगवेगळ्या राज्यांमध्ये ही स्पर्धा खेळली जाईल. लवकरच या स्पर्धेच्या पूर्ण वेळापत्रकाची घोषणा करण्यात येईल, अशी माहिती बीसीसीआयने दिली आहे.
महत्त्वाचे म्हणजे, रैना याच टी२० स्पर्धेचा भाग असणार आहे. तो सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमधील उत्तर प्रदेश संघाचे प्रतिनिधित्त्व करणार आहे. स्वत: रैनाने सर्वांना या गोष्टीची माहिती दिली आहे. सोशल मीडियावर रैनाने नेट्समध्ये सराव करतानाचे फोटो शेअर केले आहेत. त्यातील एका फोटोमध्ये युवा फलंदाज प्रियम गर्गही रैनासोबत असल्याचे दिसत आहे.
All set for the camp, warming up for the upcoming season among the lions of @UPCACricket ! #AllSet #Goals #Cricket #Passion #BigGoals pic.twitter.com/Fe0jvNBZ7q
— Suresh Raina🇮🇳 (@ImRaina) December 13, 2020
उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनने गर्गला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतील उत्तर प्रदेश संघाचे नेतृत्त्वपद सोपवले आहे, तर युवा गोलंदाज करण शर्मा याची उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यामुळे रैना गर्गच्या नेतृत्त्वाखाली खेळताना दिसेल.
महत्त्वाच्या बातम्या-
युवा खेळाडूंना आयपीएल लिलावापूर्वी मिळणार व्यासपीठ, मुश्ताक अली टी२० स्पर्धेच्या तारखा जाहीर
बचके रेहना इंडिया वालो! कसोटी मालिकेपूर्वी सचिन तेंडुलकरचा भारतीय संघाला इशारा, म्हणाला…
“मी तयारी करून आलो आहे”, कसोटी मालिकेआधी युवा भारतीय खेळाडूचे वक्तव्य