आयसीसी टी20 विश्वचषकातील (ICC T20 World Cup 2024) 8वा सामना आज (5 जून) रोजी भारत विरुद्ध आयर्लंड यांच्यामध्ये खेळला जाणार आहे. तत्पूर्वी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) म्हणाला की, “टी20 विश्वचषकाच्या अनेक सामन्यात भारतीय संघाचे फिरकीपटू महत्त्वाची भूमिका बजावताना दिसणार आहेत.” आयर्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत बोलताना रोहित म्हणाला, “जशी टी20 विश्वचषकाची स्पर्धा पुढे जाईल, त्यावेळी आम्ही विचार करु की, अष्टपैलू खेळाडूंचा उपयोग कसा करायचा?”
पुढे बोलताना कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) म्हणाला, “आयर्लंडविरुद्धचा सामना हा खूप रोमांचक होईल. त्यांच्याकडेसुद्धा महान खेळाडू आहेत. त्यांनी खूप टी20 क्रिकेट खेळलं आहे. त्यांचे अनेक खेळाडू जगातल्या अनेक क्रिेकेटच्या स्पर्धांमध्ये भाग घेतात. हा सामना तितकाच अटीतटीचा होईल, जितके आम्ही विरोधी संघाविरुद्ध खेळतो. त्यामुळे आम्हाला या सामन्यात लक्ष्यपूर्वक खेळावं लागणार आहे.”
भारतानं 2013 पासून आयसीसी स्पर्धा जिंकली नाही. त्यामुळे भारताची यंदाच्या टी20 विश्वचषकावर नक्कीच नजर असेल. भारतानं 2013 मध्ये चॅम्पियन ट्राॅफीवर नाव कोरलं होतं. त्यानंतर भारताच्या हाती फक्त निराशाच लागली. भारतीय संघ 2023 मध्ये एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत फायनल पर्यंत पोहचला, परंतु जिंकू शकला नाही. भारतानं 2015 मध्ये सेमीफायनल 2019 मध्ये बाद फेरीचे सामने गमावले आहेत. तर 2021 आणि 2023ला आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिप गमावली. 2016 आणि 2022ला सेमीफायनल सामने खेळले, परंतु आयसीसी ट्राॅफी जिंकू शकले नाहीत.
यंदाच्या टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, शिवम दुबे, संजू सॅमसन, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग.
राखीव खेळाडू: शुबमन गिल, रिंकू सिंह, आवेश खान आणि खलील अहमद.
महत्त्वाच्या बातम्या-
जगभरात किंग कोहलीचीच हवा! सुपरस्टार नेयमारलाही टाकले मागे
खेळाडूंना भेटण्यासाठी चाहत्यांकडून पैसे घेतले, टी20 विश्वचषकादरम्यान पाकिस्तानच्या टीमचा कारनामा
टी20 विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यापूर्वी पाकिस्तानचा ‘हा’ फिरकीपटू बाहेर