प्रतिष्ठित इंडियन प्रीमियर लीगचा तेरावा हंगाम प्लेऑफच्या दिशेने जात आहे. अशात बुधवारी (२८ ऑक्टोबर) अबु धाबीमध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात आयपीएल २०२०चा ४८वा सामना झाला. प्लेऑफमध्ये स्थान पक्के करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला हा सामना मुंबईसाठी एका वेगळ्याच कारणामुळे खास ठरला.
बेंगलोरविरुद्धचा हा सामना मुंबई इंडियन्सचा तब्बल २२१ वा टी२० सामना होता. यासह मुंबई संघ आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळणारा पहिला संघ ठरला आहे. तसेच टी२० क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक सामने खेळणाऱ्या संघांच्या यादीत संयुक्तपणे अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे. मुंबईव्यतिरिक्त सोमरसेट संघानेही टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक २२१ सामने खेळले आहेत.
तर हॅमशायर संघ २१७ टी२० सामन्यांसह या यादीत दूसऱ्या स्थानावर आहे. शिवाय ससेक्स (२१२ टी२० सामने) आणि सरे (२११ सामने) हे संघ सर्वाधिक टी२० सामने खेळणाऱ्या संघांच्या यादीत अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानवर आहेत.
महत्वाच्या बातम्या-
Video: दिल्लीविरुद्धचा सामना वॉर्नरसाठी ठरला खास; रात्री वाढदिवसाचा ‘असा’ घेतला आनंद
‘काही लोकांसाठी मुंबई म्हणजेच सर्वकाही,’ पाहा कुणावर साधला श्रीकांत यांनी निशाणा
विकेटकीपर रिषभ पंतला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून का मिळाला डच्चू?, माजी क्रिकेटरने दिले स्पष्टीकरण
ट्रेंडिंग लेख-
हैदराबादचे ‘हे’ पाच धुरंदर अख्ख्या दिल्लीवर पडले भारी; मिळवला दणदणीत विजय
…आणि सचिनचे शब्द हार्दिकने खरे करून दाखवले !
चार असे निर्णय, जे ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय कसोटी संघासाठी ठरु शकतात महागडे