भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील कसोटी मालिकेत स्टार फलंदाज रूतुराज गायकवाडला (Ruturaj Gaikwad) संधी मिळाली नाही. तो दुलीप ट्रॉफीमध्ये (Duleep Trophy) इंडिया सी संघाकडून खेळत आहे. या स्पर्धेत रुतुराज संघाचा कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली इंडिया सी संघ चमकदार कामगिरी करत आहे. तत्पूर्वी सामनादरम्यान रूतुराज गायकवाडने एक उत्कृष्ट झेल घेतला ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आंध्र प्रदेशातील अनंतपूर येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्यात इंडिया ए संघाने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंडिया सी विरुद्ध दुसऱ्या डावात 333 धावांची आघाडी घेतली आहे. इंडिया ए संघाने पहिल्या डावात 297 धावा केल्या होत्या. त्यानंतर इंडिया सी संघ 234 धावांवर गारद झाला. तत्पूर्वी या सामन्यात एक असा क्षण आला, ज्याने सर्वांची मने जिंकली. कर्णधार रुतुराजने जबरदस्त झेल घेतला.
गायकवाडने डावीकडे हवेत झेप घेत झेल पकडला आणि रियान परागला (Riyan Parag) पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले. तोपर्यंत इंडिया ए संघाची आघाडी 264 धावांची होती. पराग त्यावेळी 73 धावांवर खेळत होता. दरम्यान तो त्याच्या शतकाकडे वाटचाल करत होता. गायकवाडने दमदार प्रयत्न केले नसते तर परागला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये चौथे शतक झळकावता आले असते.
One-handed STUNNER! 🔥
Ruturaj Gaikwad is on fire on the field. He’s pulled off yet another splendid catch, this time to dismiss Riyan Parag 👏#DuleepTrophy | @IDFCFIRSTBank
Follow the match ▶️: https://t.co/QkxvrUnnhz pic.twitter.com/6IcU3wwk2X
— BCCI Domestic (@BCCIdomestic) September 21, 2024
महत्त्वाच्या बातम्या-
भर सामन्यात केएल राहुलची फजिती, सिराजला आवरलं नाही हसू; व्हिडिओ होतोय व्हायरल
पंत करणार विश्वविक्रम! माजी दिग्गजाची मोठी भविष्यवाणी
इंग्लंडसाठी 200 वनडे विकेट घेणार पहिला फिरकीपटू, 36 वर्षीय दिग्गजाची ऐतिहासिक कामगिरी