बीसीसीआयची (BCCI) क्रिकेट सल्लागार समितीने (Cricke Advisory Committee) (सीएसी) राष्ट्रीय निवड समितीची दोन रिक्त पदे भरण्यासाठी बुधवारी (4 मार्च) 5 उमेदवारांची मुलाखत घेण्यात येणार होती. या पदांच्या शर्यतीत कर्नाटकचे व्यंकटेश प्रसाद (Venkatesh Prasad) आणि सुनील जोशी (Sunil Joshi) यांचा समावेश आहे.
त्याचबरोबर भारताचा माजी फिरकीपटू लक्ष्मण शिवरामाकृष्णन, राजेश चौहान आणि मध्यम गति गोलंदाज हरविंदर सिंग यांनाही राष्ट्रीय निवड समितीच्या मुलाखतीसाठी बोलावण्यात आले होते.
बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीमध्ये (CAC) भारताचे माजी अष्टपैलू क्रिकेटपटू मदन लाल (Madan Lal), आर.पी सिंग (R. P. Singh) आणि सुलक्षणा नाईक (Sulakshana Naik) यांचाही समावेश आहे. राष्ट्रीय निवड समितीचे माजी अध्यक्ष एमएसके प्रसाद आणि त्यांचे सहकारी गगन खोडा यांच्या जागी नवीन निवडकर्ते निवडले जातील.
या दोन पदांसाठी एकूण 44 अर्ज करण्यात आले होते. या उमेदवारांमध्ये भारताचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकरचाही समावेश होता. आगरकरला या पदासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. आगरकर व्यतिरिक्त भारताचा माजी यष्टीरक्षक नयन मोंगियानेही या पदासाठी अर्ज केला होता.
“निवडकर्त्याच्या पदासाठी आगरकरच्या नावाचाही विचार करण्यात आला होता. परंतु शेवटी सीएसीने लक्ष्मण, प्रसाद, जोशी, चौहान आणि हरविंदर यांची मुलाखत घेण्याचा निर्णय घेतला. तसेच 3 इतर निवडकर्त्यांचा (जतिन परांजपे, शरणदीप सिंग आणि देवांग गांधी) कार्यकाळ संपल्यानंतर आगरकरच्या नावाचाही विचार करण्याची शक्यता आहे,” असे बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयशी बोलताना सांगितले.
या पदासाठी आगरकरची निवड न केल्यामुळे बीसीसीआय राष्ट्रीय निवडकर्त्यांसाठी आहे त्या धोरणावर कायम राहण्याची शक्यता आहे. जर असे झाले तर पंजाब आणि रेल्वे संघाकडून खेळणारे हरविंदर यांना खोडा यांच्या जागी मध्य भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड केली जाऊ शकते.
तसेच लक्ष्मण, प्रसाद आणि जोशी यांपैकी एका उमेदवाराला एमएसके प्रसाद यांच्या जागी दक्षिण भारताचा प्रतिनिधी म्हणून निवड समितीमध्ये स्थान देण्यात येऊ शकते.
“भारत खूप मोठा देश आहे. त्यासाठी प्रतिनिधित्व करणे गरजेचे आहे,” असेही बीसीसीआयचा अधिकारी यावेळी म्हणाला.
वेंकटेश प्रसादला या पदाचा काही प्रमाणात अनुभव आहे. तो ज्यूनियर निवड पॅनेलचा भाग राहिला आहे. 50 वर्षीय प्रसादने 33 कसोटी आणि 161 वनडे सामने खेळले आहेत. यामध्ये त्यांनी अनुक्रमे 96 आणि 196 विकेट्स घेतल्या आहेत.
54 वर्षीय लक्ष्मण यांनी 9 कसोटी आणि 16 वनडे सामने खेळले आहेत. तर हरविंदरने 3 कसोटी आणि 16 वनडे सामने खेळले आहेत. या पदाच्या शर्यतीतील चौहान यांनी 21 कसोटी आणि 35 वनडे सामने खेळले आहेत. तर जोशी यांनी 15 कसोटी आणि 69 वनडे सामने खेळले आहेत.
नवीन निवडसमिती 12 मार्चपासून होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3 सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची निवड करेल. सीएसीची निवड 31 जानेवारी ला करण्यात आली होती. परंतु त्याची पहिली बैठक मंगळवारी (3 मार्च) झाली.
महत्त्वाच्या बातम्या-
–टीम इंडियाविरुद्ध सेमीफायनलमध्ये जिंकायचे असेल तर करावी लागेल ही महत्त्वाची गोष्ट
–ऐकावे ते नवल! मुंबई इंडियन्सची किंमत ऐकून हादराल
–टी२० सामन्यात हार्दिक पंड्याचे तुफानी शतक; अर्ध्या संघालाही पाठवले तंबूत