भारतीय संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे कसोटी क्रिकेटमध्ये सतत फ्लॉप ठरत आहे. अजिंक्य रहाणे सध्या त्याच्या कारकिर्दीच्या अत्यंत वाईट टप्प्यातून जात आहे. ओव्हल कसोटी सामन्यात त्याच्या खराब फॉर्ममुळे भारतीय संघ व्यवस्थापनाने रवींद्र जडेजाला त्याच्या आधी पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवले होते.
ओव्हल कसोटीच्या पहिल्या डावात अजिंक्य रहाणेच्या जागी रवींद्र जडेजाला पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात आले, तेव्हा असे वाटत होते वेगवान धावा करण्यासाठी भारतीय संघाने रविंद्र जडेजाला बढती दिली आहे. पण जेव्हा दुसऱ्या डावातही त्याला रहाणेच्या जागी खेळवले गेले, तेव्हा संघ व्यवस्थापन काय विचार करत आहे हे स्पष्ट झाले आहे.
रहाणेच्या जागी पाचव्या क्रमांकावर जडेजाला फलंदाजीला पाठवण्याचा कर्णधार विराट कोहलीचा निर्णय हेच दर्शवतो की, रहाणेच्या खराब फॉर्ममुळे भारतीय संघ त्रस्त आहे. त्याला वाचवण्यासाठी संघ व्यवस्थापन त्याच्या आधी जडेजाला पाचव्या क्रमांकावर पाठवत आहे. चौथ्या कसोटीमध्ये रहाणेने केवळ १४ आणि ० धावा करत माघारी फिरला. आता संघ व्यवस्थापन पुढील सामन्यात त्याला बाहेर काढू शकते.
या योजनेचा अवलंब करण्याचे एकमेव कारण रहाणेचा सध्याचा खराब फॉर्म आहे. इंग्लंडविरुद्धच्या या कसोटी मालिकेतील ४ सामन्यांच्या ६ डावांमध्ये रहाणेने ५, १, ६१, १८, १०, १४ आणि ० धावा केल्या आहेत.
भारतीय संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित करत म्हटले आहे की, ‘रहाणेने गेल्या काही सामन्यांमध्ये धावा केलेल्या नाहीत. पण कोहली आणि पुजाराच्या बाबतीतही असेच होते, मग रहाणेच्या क्रमवारीत बदल का झाला?’ त्याचा हा प्रश्नही सर्वांना विचार करण्यास भाग पाडणारा आहे.
भारतीय संघामध्ये चार खेळाडू आहेत, जे पुढील कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणेऐवजी संघात सहभागी होऊ शकतात. मयंक अग्रवाल, हनुमा विहारी, केएल राहुल, सुर्यकुमार यादव आणि पृथ्वी शॉ हे रहाणेच्या स्थानासाठी दावेदार असतील. ते पाचव्या क्रमांकावरही फलंदाजी करू शकतात. पुढील कसोटी सामना १० सप्टेंबरपासून मँचेस्टर मैदानावर खेळला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या-
हलक्यात घेऊ नका, शास्त्रींचा कोरोना भारतीय खेळाडूंच्या मुलांसाठी धोकादायक; माजी क्रिकेटर चिंतीत
फॉर्मात परतण्यासाठी सेहवागचा रहाणेला रामबाण उपाय; म्हणाला, ‘आई-वडिलांसाठी मैदानावर…’
भारतीय शिलेदारांच्या ‘सांघिक कामगिरी’मुळे इंग्लंडचा विजयपथ कठीण, नोंदवला अद्भुत विक्रम