सध्या भारतीय संघ दक्षिण आफ्रिका (India tour of South Africa) दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाला ३ कसोटी आणि ३ वनडे सामन्यांची मालिका खेळायची आहे. कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना सेंच्युरियनच्या (centurion) मैदानावर सुरू आहे. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. परंतु, भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) पुन्हा एकदा फ्लॉप ठरला. या सामन्यातील दोन्ही डावात त्याला अर्धशतक देखील झळकावता आले नाहीये. दरम्यान, ज्या गोलंदाजाने त्याच्यासोबत सराव केला होता, त्यानेच त्याला बाद करत माघारी धाडले आहे.
विराट कोहलीची आंतरराष्ट्रीय शतक झळकावण्याची प्रतीक्षा आणखी लांबणीवर गेली आहे. त्याने शेवटचे शतक २०१९ मध्ये बांगलादेश संघाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत झळकावले होते. त्यानंतर २०२० आणि २०२१ वर्ष उलटून गेलं तरीदेखील त्याची शतकाची प्रतीक्षा संपली नाहीये. अशातच दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्याच सामन्यात त्याला २१ वर्षीय दक्षिण आफ्रिकन गोलंदाज मार्को जेंसनने बाद करत माघारी धाडले आहे.
Marco Jansen bringing the magic on debut???? #SAvIND #FreedomTestSeries #BetwayTestSeries #BePartOfIt pic.twitter.com/7cYIorUwsY
— Proteas Men (@ProteasMenCSA) December 29, 2021
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने दुसऱ्या डावात मार्को जेंसनच्या (Marco Jansen) चेंडूवर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. परंतु, चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर असल्याने चेंडूने बॅटचा कडा घेतला आणि यष्टिरक्षक क्विंटन डी कॉकच्या हातात गेला. त्याने ३२ चेडूंमध्ये १८ धावांची खेळी केली होती. तो चांगल्याच लयीत असल्याचे दिसून येत होते. परंतु, यावेळी देखील त्याला नशीबाची साथ मिळाली नाही. विराट कोहलीला बाद केल्यानंतर मार्को जेंसनचा आनंद पाहण्यासारखा होता.
कारण मार्को जेंसन ज्यावेळी १८ वर्षांचा होता, त्यावेळी त्याने विराट कोहलीला नेट्समध्ये गोलंदाजी केली होती. त्यामुळे, पहिल्याच सामन्यात विराट कोहलीला बाद करणं त्याच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. (Virat Kohli got out by debutant Marco Jansen in his debut match)
हे नक्की पाहा: हे आहेत भारतीय गोलंदाज, पण फलंदाजी करताना कसोटीत केलंय शतक
नुकताच भारत अ विरुद्ध दक्षिण आफ्रिका अ संघांमध्ये झालेल्या मालिकेत मार्को जेंसनने फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये अप्रतिम कामगिरी केली होती. त्याने ३ कसोटी सामन्यांच्या अनधिकृत कसोटी मालिकेत ६ गडी बाद केले होते. तसेच त्याने १९ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ७० गडी बाद केले आहेत.
महत्वाच्या बातम्या :
नव्या आयसीसी क्रमवारीत अश्विनने उंचावला टीम इंडियाचा झेंडा; रोहित-विराट ‘या’ क्रमांकावर
दिग्गजाने सांगितले इंग्लंडच्या लाजिरवाण्या पराभवाचे खरे कारण; म्हणाला…