दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना सेंच्युरियनच्या (Centurion) मैदानावर पार पडला होता. या मालिकेत भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी करत ११३ धावांनी विजय मिळवला होता. यासह भारतीय संघाने मालिकेत १-० ची आघाडी घेतली आहे. आता दुसरा कसोटी सामना जोहान्सबर्गच्या (Johanasburg) मैदानावर पार पडणार आहे. या सामन्यात भारतीय संघ विजय मिळवून मालिका आपल्या खिशात घालण्याच्या प्रयत्नात असणार आहे. परंतु दुसऱ्या कसोटी सामन्यात एक मोठा अडथळा येऊ शकतो.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यातील दुसरा कसोटी सामना सोमवारपासून (३ जानेवारी ) सुरू होणार आहे. जोहान्सबर्गमध्ये शनिवारी आणि रविवारी पावसाचे आगमन झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे सोमवारी देखील पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पावसामुळे सामना सुरू व्हायला उशीर देखील होऊ शकतो. यापूर्वी सेंच्युरियन कसोटीच्या शेवटच्या दिवशी देखील पाऊस येण्याची शक्यता व्यक्त केली गेली होती. परंतु असे काहीच झाले नव्हते आणि हा सामना भारतीय संघाने आपल्या नावावर केला होता.
हवामान खात्याने जो अंदाज व्यक्त केला आहे त्यानुसार, दुसऱ्या कसोटी सामन्यात पाऊस विघ्न घालणार यात काहीच शंका नाही. पावसामुळे खेळ रद्द झाला तर भारतीय संघाच्या चिंतेत वाढ होऊ शकते. पहिल्या दिवशी ११% ,दुसऱ्या दिवशी ८०%, तिसऱ्या दिवशी ५५%, चौथ्या दिवशी ८०% आणि पाचव्या दिवशी देखील ८०% पाऊस पडण्याची शक्यता आहे.
जोहान्सबर्ग कसोटीत पाऊस पडण्याची शक्यता (weather update of second test between sa vs Ind)
पहिला दिवस – ११ %
दुसरा दिवस -८०%
तिसरा दिवस – ५५%
चौथा दिवस – ८०%
पाचवा दिवस – ८०%
Cannot ask for a better end to 2021! 👏 👏@28anand captures the essence and vibes in Centurion post #TeamIndia's historic Test win at SuperSport Park. 👌 👌 #SAvIND
Watch the full video 🎥 🔽https://t.co/49IFMY2Lxl pic.twitter.com/PnIaswqsH7
— BCCI (@BCCI) December 31, 2021
दुसऱ्या कसोटीसाठी दोन्ही संघांची संभावित प्लेइंग ११ (Playing 11 for second test)
दक्षिण आफ्रिका: डीन एल्गर (कर्णधार), एडन मार्करम, कीगन पीटरसन, रासी वान दर डूसेन, टेंबा बावुमा, काइल व्हर्न (यष्टिरक्षक), विल्यम मुल्डर, मार्को जेंसन, केशव महाराज.
भारत: केएल राहुल, मयांक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत (यष्टिरक्षक), रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
महत्वाच्या बातम्या :
न्यू इयर बोनस! रणजी ट्रॉफी सुरू होण्यापूर्वीच बीसीसीआयने खेळाडूंना केले मालामाल; वाचा सविस्तर
सलामीवीर की फिनीशर कोणती भूमिका आवडेल? वेंकटेश अय्यरने दिले ‘असे’ उत्तर
हे नक्की पाहा :