भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये आजपासून (18 जून) विश्व कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना सुरू होणार आहे. या अंतिम सामन्यासाठी एका दिवसापुर्वीच भारतीय संघाने प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी फिरकीपटू रवींद्र जडेजावर विश्वास ठेवून त्यांना संघात खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनलाही संघात स्थान देण्यात आले आहे. संघात इशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह या तीन वेगवान गोलंदाजांना संघात स्थान देण्यात आले आहे.
परंतु साउथम्पटन येथील हवामान आणि खेळपट्टी पाहता भारतीय संघाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उभारले आहे. कारण साउथम्पटनमध्ये काल रात्रभर पाऊस चालू होता आणि पुढील पाच दिवस पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच मैदानावर पूर्णवेळ ढग दाटलेलेही असू शकता. अशातच वेगवान गोलंदाजांना मदत मिळणार हे निश्चित आहे. परंतु दुसरीकडे खेळपट्टीवर अजुनही गवत आहे. सामना सुरू होण्याअगोदर हे गवत काढले नाही, तर भारतीय संघातील दोन फिरकी फिरकीपटूना संघात स्थान देण्याचा निर्णय चुकू शकतो.
भारताकडे चौथ्या वेगवान गोलंदाजाच्या रूपात मोहम्मद सिराज आहे. ज्याने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या विरुद्ध उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. हार्दिक पांड्या सध्या कसोटी संघातून बाहेर आहे आणि भारताजवळ असा अष्टपैलू खेळाडू नाही जो वेगवान गोलंदाजी करू शकतो. शार्दुल ठाकुर गोलंदाजी आणि कालचलाऊ फलंदाजीही करू शकतो. परंतु त्याला विश्व कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात भारतीय संघामध्ये स्थान दिले नाही.
अशा परिस्थितीमध्ये अष्टपैलू खेळाडूच्या रूपात फक्त रवींद्र जडेजा आणि आर अश्विन यांचा पर्याय आहे. परंतु परदेशी दौऱ्यावर जडेजा आणि अश्विन ही जोडीला जास्त यश मिळाले नाही.
जडेजा आणि अश्विनने एकत्र 35 कसोटी सामने खेळले आहेत आणि 362 बळी आपल्या नावावर केले आहे. परंतु परदेशी खेळपट्टीवर या जोडीने जास्त कसोटी सामने खेळले नाहीत. या जोडीला सर्वात जास्त यश भारतीय खेळपट्टींवर मिळाले आहे. इंग्लंडमध्ये जडेजाने पाच कसोटी सामन्यांमध्ये 16 बळी घेतले. तर अश्विनने सहा कसोटी सामन्यांमध्ये फक्त 14 बळी घेतले आहेत.
न्युझीलंड संघाबद्दल बोलायचे झाले तर अश्विनने या संघाविरुद्ध सहा कसोटी सामन्यांमध्ये 48 बळी घेतले. तर जडेजाने देखील सहा कसोटी सामन्यांमध्ये फक्त 19 बळी घेतले आहेत. जडेजाला परदेशी खेळपट्टींवर बळी घेण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो.
WTC च्या अंतिम सामन्यासाठीचा भारतीय संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे(उप कर्णधार), रिषभ पंत(यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा ओर मोहम्मद शमी.
महत्वाच्या बातम्या-
नादच खुळा! अश्विन- जडेजाची जोडी बनेल भारतीय संघासाठी ब्रह्मास्त्र, ३५ कसोटीत घेतल्यात ३६२ विकेट्स
भारत-न्यूझीलंड फायनलवर संकटाचे ‘काळे ढग’, पहिल्या दिवसाचा खेळ उशिरा सुरू होण्याचे संकेत
कसोटी चॅम्पियनशीपपुर्वी झालेल्या टेस्ट ग्रँड फायनल्सचा ‘असा’ राहिलाय इतिहास, वाचा सविस्तर