क्रिडाक्षेत्रात चालू सामन्यात मैदानावरच खेळाडूंचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटना आपण बऱ्याचदा पाहिल्या आहेत. अशीच एक धक्कादायक घटना एका ग्रामीण कबड्डी स्पर्धेदरम्यान घडली आहे.
सध्या ग्रामीण पातळीवर वेगवेगळ्या कबड्डी स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. छत्तीसगड राज्यातील धमतरी जिल्ह्यातील गोजी गावातही अशाच एका दोन दिवसीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी (२० जानेवारी) या स्पर्धेतील कोकडी आणि पटेवा या संघांदरम्यान कबड्डीचा डाव रंगला होता. या डावाची लढाई अंतिम टप्प्यात आली असताना, कोकडी संघाचा खेळाडू नरेंद्र साहू अखेरच्या रेडसाठी गेला.
बोनसच्या पट्टीला स्पर्श केल्यानंतर संघासाठी २ गुणांची कमाई करत नरेंद्र माघारी परतत होता. अशात विरोधी पटेवा संघाच्या एका खेळाडूने त्याचा पाय पकडत त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. हे पाहून इतर खेळाडूंनीही नरेंद्रला पकडण्यासाठी घेरा घातला. या गोंधळात नरेंद्र जोरात मैदानावर कोसळला. यावेळी त्याचे डोके त्याच्या शरीराच्या वजनाखाली दबले गेले आणि पटेवा संघाचे काही खेळाडूही त्याला अडवण्याच्या प्रयत्नात त्याच्या अंगावर पडले.
नंतर जेव्हा पटेवा संघाच्या खेळाडूंनी नरेंद्रला सोडले, त्यानंतर तो उठलाच नाही. त्यामुळे सामना पंच आणि खेळाडूंनी मिळून त्वरित त्याला रुग्णालयात दाखल केले. परंतु रुग्णालयात उपचारावेळी त्याचा मृत्यु झाला. त्याच्या निधनामुळे पूर्ण गाव शोकसागरात बुडाला आहे.
कबड्डी में जब जिंदगी की रेड पर मौत की जीत हुई,
जिंदगी से मौत तक का सफर महज 16 सेकंड में तय हो गया।
छत्तीसगढ़ के धमतरी जिले के एक गांव में आयोजित कबड्डी मुकाबले के दौरान नरेंद्र साहू नामक खिलाड़ी की दुःखद मौत,@KirenRijiju जी@umeshpatelcgpyc जी कृपया संज्ञान लीजिए। pic.twitter.com/0mRYVB2WeD— Dr. Awadhesh Mishra (@AwadheshMishra_) January 21, 2021
https://twitter.com/riteshmishraht/status/1352233151804841990?s=20
छत्तीसगडचे विद्यमान मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी यासंदर्भात ट्विट करत दु:ख व्यक्त केले आहे.
धमतरी के गोजी गांव में कबड्डी प्रतियोगिता के दौरान खिलाड़ी नरेन्द्र साहू की मौत की ख़बर विचलित और दुखी करने वाली है।
इस दुःख की घड़ी में मेरी संवेदनाएं परिवार के साथ हैं। ईश्वर आत्मा को शांति दे।
प्रदेश के सभी खिलाड़ियों से मेरा निवेदन है कि सुरक्षा का ध्यान रखें।
— Bhupesh Baghel (@bhupeshbaghel) January 21, 2021
“धमतरी येथील गोजी गावात कबड्डी सामन्यादरम्यान खेळाडू नरेंद्र साहू याचा मृत्यु झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. या दु:खदायी घडीला मी नरेंद्र याच्या कुटुंबीयांबद्दल शोक व्यक्त करतो. त्याच्या आत्म्याला शांती लाभो. प्रदेशातील सर्व खेळाडूंना माझे निवेदन आहे की, सर्वांनी आपल्या सुरक्षेची काळजी घ्यावी”, असे ट्विटमध्ये त्यांनी लिहिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
प्रो कबड्डी लीगचे आठवे पर्व ढकलले पुढे, आता ‘या’ वर्षी होणार स्पर्धा
राजस्थान सरकारचा अजब निर्णय, सुवर्णपदक विजेत्या कबड्डीपटूला बसला फटका
कबड्डीच्या पहिलावहिल्या अर्जून पुरस्कार विजेत्याने असा केला होता आनंद साजरा