गुरुवारी (२४ सप्टेंबर) किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात आयपीएल २०२०चा ६वा सामना पार पडला. दुबईच्या मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात पंजाबने तब्बल ९७ धावांनी दमदार विजय मिळवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पंजाबने ३ विकेट्स गमावत २०६ धावांचा डोंगर उभा केला होता. बेंगलोर संघाला पंजाबच्या २०७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना १७ षटकात केवळ १०९ धावाच करता आल्या.
सामन्यादरम्यान पंजाब संघाची मालकिण प्रीति झिंटा ही स्टेडियममध्ये उपस्थित होती. तसेच संघाने ज्याप्रकारे प्रदर्शन करत सामना जिंकला, त्यामुळे तर ती भलतीच खूश झाली. अशात तिने आनंदाच्या भरात असे काही केले, जे स्टेडियमच्या नियमाच्या विरुद्ध होते. Preity Zinta Breaks Ground Rule During The Match
झाले असे की, सामना चालू असताना आपल्या संघाला चीयर करणारी प्रीति झिंटा एका अशा खुर्चीवर बसली, जिथे बसण्यास बंदी होती. त्या खुर्चीवर स्पष्ट लिहिले होते की, ‘कृपया इथे बसू नये’. तरी ती पूर्ण सामना होईपर्यंत तिथेच बसून राहिली.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर युएईत आयोजित करण्यात आलेल्या आयपीएल २०२०मधील सर्व सामने रिकाम्या स्टेडियममध्ये खेळले जात आहेत. खेळाडूंच्या सुरक्षेसाठी बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे. असे असले तरी, संघाचा स्टाफ आणि खेळाडूंच्या कुटुंबातील व्यक्तींना युएईमध्ये जाण्याची परवानगी आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
स्टिंग ऑपरेशन! जेव्हा टीव्ही चॅनेल वाल्यांनीच वाजवले होते भारतीय क्रिकेटरचे बारा
डिन जोन्स यांनी स्वत:च्या मुलाला कधीच पाहिले नव्हते, कारणही आहे तसंच
दुबईत आज चेन्नई आणि दिल्लीत लढत, जाणून घ्या या सामन्याबद्दल सविस्तर माहिती
ट्रेंडिंग लेख –
‘या’ पाच कारणांमुळे विराट कोहलीच्या आरसीबी संघाचा पंजाबविरुद्ध झाला पराभव
शतक एक विक्रम अनेक! जाणून घ्या केएल राहुलने केलेले ८ महत्त्वाचे विक्रम
सुपर ओव्हर टाकायचीये? पाहा प्रत्येक संघातील ‘अशा’ खास खेळाडूंची नावे