जागतिक क्रिकेटमधील सर्वात मोठी टी२० लीग म्हणजे इंडियन प्रीमियर लीग. आयपीएलचा प्रत्येक मोसम यशस्वी होत आहे. २००८ मध्ये सुरु झालेल्या या टी२० लीग मध्ये संपूर्ण भारत आणि परदेशातील शेकडो खेळाडू सहभागी झाले आहेत.
आयपीएलने आतापर्यंत १२ वेळा ही स्पर्धा आयोजित केली, ज्यात प्रत्येक मोसमात कोणत्या ना कोणत्या खेळाडूने उत्तम प्रदर्शन केलं आहे. आयपीएलचा प्रत्येक मोसम वेगवेगळ्या खेळाडूंच्या जबरदस्त कामगिरीची साक्ष देतो. परंतु असे काही खेळाडू आहेत, ज्यांनी पहिल्या सत्रापासूनच आपलं दमदार प्रदर्शन केले आहे.
चला तर मग बघूया कोण आहेत ते ५ असे खेळाडू, जे आयपीएलच्या इतिहासात अयशस्वी ठरले नाहीत.
हे ५ खेळाडू जे ठरले आयपीएलच्या इतिहासात यशस्वी-
१. सचिन तेंडुलकर
भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अभूतपूर्व कामगिरी केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचे शतक करणाऱ्या सचिनचीही बॅट आयपीएलमध्ये तळपताना पाहिली.
पहिल्या सत्रापासून सचिन मुंबई इंडियन्स संघाचा सदस्य होता. सचिनने आयपीएलच्या प्रत्येक मोसमात दमदार कामगिरी केली असून कोणत्याही मोसमात तो अयशस्वी ठरला नाही. सचिनने आयपीएलमध्ये ७८ सामन्यांत ३४.८३ च्या सरासरीने २३३४ धावा बनवल्या आहेत. विशेष म्हणजे त्याने आयपीएलमध्येही १ शतक ठोकले आहे. तसेच १३ अर्धशतकांचाही त्यामध्ये समावेश आहे.
२. सुरेश रैना
भारतीय क्रिकेट संघातील मधल्या फळीतील विश्वसनीय फलंदाजांपैकी एक सुरेश रैना (Suresh Raina) हा गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघातून बाहेर आहे. परंतु आयपीएलमध्ये रैना हा एक विस्फोटक फलंदाज म्हणून दिसतो. त्याने प्रत्येक मोसमात ३५० हून अधिक धावा केल्या आहेत. त्याच्याशिवाय कोणत्याही फलंदाजाने अशी कामगिरी केलेली नाही.
रैना आयपीएलच्या पहिल्या सत्रापासून उकृष्ठ फलंदाजी करत आहे. त्याला अशा दमदार कामगिरीमुळे त्याला ‘मिस्टर आयपीएल’ या नावानेही ओळखले जाते. चेन्नई सुपर किंग्जशिवाय (Chennai Super Kings) रैना दोन मोसमात गुजरात लायन्सकडूनही खेळला होता. त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत १९३ सामन्यात ३३.३४ च्या सरासरीने ५३६८ धावा केल्या आहेत. त्यामध्ये १ शतक आणि ३८ अर्धशतकांचा समावेश आहे.
३. लसिथ मलिंगा
श्रीलंकेचा महान वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा (Lasith Malinga) टी२० क्रिकेटमधील सर्वात
घातक गोलंदाज मानला जातो. मलिंगा आपल्या कारकिर्दीच्या अंतिम टप्प्यात आहे. परंतु त्याने श्रीलंकेसाठी अविस्मरणीय कामगिरी केली आहे. या व्यतिरिक्त मलिंगाने आयपीएलमध्येही उत्तम कामगिरी केली आहे.
आयपीएलच्या पहिल्या सत्रापासूनच मलिंगाने जबरदस्त कामगिरी बजावली आहे. पहिल्या सत्रापासून मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) खेळणाऱ्या मलिंगाने आयपीएलमध्ये खेळलेल्या १२२ सामन्यात सर्वाधिक १७० विकेट्स घेण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे. त्याने आतापर्यंत ९ मोसम खेळले आहेत आणि सर्व मोसमात त्याने १० हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत.
४. एमएस धोनी
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) हा भारताच्या इतिहासातील एक महान कर्णधार आहे. धोनीने आपल्या कर्णधारपदाखाली भारतीय संघाला एका उंचीवर नेले आहे. तसेच फलंदाजीत चमकदार कामगिरीमुळे त्याला ‘मैच फिनिशर’ म्हणून त्यांची ओळख आहे.
आयपीएल ८ च्या पहिल्या सत्रापासून धोनीची कामगिरी ही या लीगमध्ये खूपच प्रभावी होती. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार असताना धोनीने चमकदार कामगिरी केली. दरम्यान दोन वर्षे रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून खेळलेल्या धोनीने आयपीएलमध्ये आतापर्यंत १९० सामन्यांमध्ये ४२.९० च्या सरासरीने ४४३२ धावा केल्या. त्यात २३ अर्धशतकांचा समावेश आहे. धोनी फलंदाजीत काही वेळा अयशश्वी झाला असेल, परंतु कर्णधार आणि यष्टीरक्षक म्हणून त्याचा सारखा कोणता खेळाडू नाही.
५. डेविड वार्नर
ऑस्ट्रेलिया संघामध्ये वादळी खेळी करणारा फलंदाज डेव्हिड वॉर्नर (David Warner) हा संघाच्या फलंदाजीचा कणा मानला जाऊ शकतो. वॉर्नरने आपली चमकदार कामगिरी केवळ एकाच स्वरुपात नव्हे, तर तीनही स्वरूपात दाखवली आहे. आयपीएलमध्येही वॉर्नर आपली वादळी खेळी करतो आहे.
या ऑस्ट्रेलियन फलंदाजाने आयपीएलमध्ये पदार्पण करत प्रत्येक मोसमात सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे. वॉर्नरला आयपीएलचा सर्वात यशस्वी विदेशी फलंदाज म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही कारण वॉर्नरची आकडेवारीच असं सांगत आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत वॉर्नरने १२६ सामन्यात ४३.१७ च्या सरासरीने ४७०६ धावा केल्या आहेत. त्याच्या मागील ५ हंगामात, त्याने प्रत्येक वेळी ५०० धावांचा आकडा पार केला आहे. त्यात ४ शतके आणि ४४ अर्धशतकांचा समावेश आहे.
वाचनीय लेख-
-या ५ कारणांमुळे रणजी खेळूनही श्रीसंतचे कमबॅक ठरणार महाकठीण
-गोष्ट त्या टीम इंडियाची, जिचे कर्णधार होतं असे राजे महाराजे
-क्रिकेटपटूंना स्वत: देखील आठवावे वाटणार नाहीत असे ७ लाजीरवाणे विक्रम