क्रिकेटमध्येच नाही तर कोणताही खेळ खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात अशी एक वेळ अशी येते की, त्याला त्याच्या खेळातून निवृत्ती घ्यावी लागते. काही खेळाडूंची कारकीर्द खूप लांबपर्यंत चालते तर काहींची मधेच संपुष्टात येते. निवृत्ती घेण्यामागे प्रत्येक खेळाडूची वेगवेगळी कारणे असतात. आज आपण अशा खेळाडूबद्दल बोलणार आहोत ज्याची कारकीर्द केवळ अर्धा तास राहिली. जाणून घेऊयात या लेखामधून कोण आहे तो खेळाडू.
माजी इंग्लंडचे खेळाडू ‘एंडी लॉयड’ यांनी १४ जून १९८४ रोजी इंग्लंड संघासाठी कसोटीत पदार्पण केले. त्यांनी वेस्ट इंडीज विरुद्ध आपल्या घरच्या मैदानवर ‘एजबेस्टन’ येथे पदार्पण केले. एंडी लॉयड फलंदाजीसाठी तर उतरले परंतु, अर्धा तासच ते खेळपट्टीवर काढू शकले.
एंडी लॉयड या सामन्यात ग्रॅम फ्लोवर सोबत सलामीला उतरले. सामन्यात १७ चेंडूत १० धावा करून नाबाद होते. तेवढ्यातच वेस्ट इंडीजचे तगडे गोलंदाज ‘माल्कम मार्शल’ यांचा आखूड टप्याचा जलद गतीने आलेला चेंडू त्यांचा हेल्मेटला लागला आणि एंडी लॉयड गंभीर जखमी झाले. डोक्यावर मार लागल्यानंतर एंडी लॉयड अनेक आठवडे रुग्णालयातच होते. त्यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे ते त्यानंतर कधीही इंग्लंडसाठी खेळू शकले नाहीत.
एंडी लॉयड हे जगातील असे एकमेव सलामी फलंदाज आहेत जे, आपल्या कसोटी कारकिर्दीत राष्ट्रीय संघासाठी बाद झाले नाही. नकळत त्यांच्या नावावर झालेला हा अनोखा विक्रम आहे. एंडी लॉयड कसोटीत पदार्पण करण्याचा अगोदर इंग्लंड संघासाठी ३ एकदिवसीय सामने खेळले होते. त्या ३ सामन्यात त्यांनी ३३.६६च्या सरासरीने १०१ धावा केल्या होत्या. त्यामध्ये त्यांची सर्वोत्तम धावसंख्या ४९ राहिली.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांनी खूप विक्रम केले होते. प्रथम श्रेणीमध्ये त्यांनी २९ शतक ठोकली आहेत आणि सोबतीला ८७ अर्धशतक केली. त्यात त्यांनी १७२११ तसेच ते अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये २८७ सामने खेळले आहे. त्यात त्यांनी २ शतकं आणि ५६ अर्धशतक मारले आहेत. तसेच त्यांनी ३०.८६च्या सरासरीने ७५६२ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
जेव्हा प्रियंका चोप्रा म्हणाली होती, मोहम्मद अझरुद्दीनशी लग्न करायला आवडेल; व्हिडिओ होतोय व्हायरल
तोडफोड फलंदाजी! ‘या’ इंग्लंड फलंदाजाने तब्बल ११ षटकारांसह केली १३६ धावांची तुफानी खेळी