दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत भारताला रविवारी (१२ जून) सलग दुसरा पराभव मिळाला. पहिल्या सामन्यात भारतीय संघाने मोठे लक्ष्य उभे केले होते, पण गोलंदाजांना त्याचा बचाव करता आला नाही. तर दुसऱ्या सामन्यातही भुवनेश्वर कुमारला वगळता इतर गोलंदाज अपयशी ठरताना दिसले. दुसऱ्या सामन्यात भारताने दिलेले १४९ धावांचे लक्ष्य आफ्रिकी संघाने १८.२ षटकात गाठले. भारताचा माजी दिग्गज गोलंदाज आशीष नेहरा दुसऱ्या सामन्यात कर्णधार रिषभ पंतने घेतलेल्या काही निर्णयांमुळे नाराज असल्याचे दिसते.
उभय संघातील दुसरा टी-२० सामना कटकच्या बाराबती स्टेडियमवर खेळला गेला. भारताने प्रथम फलंदाजी करताना ६ विकेट्सच्या नुकसानावर १४८ धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिका संघाने देखील पॉवरप्लेमध्ये महत्वाच्या विकेट्स गमावल्या होत्या. पण हेन्रिच क्लासेनने मध्यक्रमात ४६ चेंडूत ८१ धावा चोपल्या आणि संघाचा विजय सोपा केला. क्लासेनपुढे भारताचा प्रत्येक गोलंदाज हतबल झाल्याचे पाहिले गेले. पण यादरम्यान अक्षर पटेल (Axar Patel) याला कर्णधार पंतने फक्त एक षटक दिले.
माजी दिग्गज आशीष नेहरा (Ashish Nehra) याच कारणास्तव पंतवर नाखुश दिसत आहे. नेहराने रिषभ पंत (Rishabh Pant) वर टीका केली आहे. नेहराच्या मते कर्णधाराने अक्षरला अजून काही षटकांमध्ये गोलंदाजी करण्यासाठी पाठवले पाहिजे होते. सामन्यात एक वेळ अशी होती, जेव्हा आफ्रिकी संघाने ५.३ षटकात अवघ्या २९ धावा केल्या होत्या. पाचव्या क्रमांकावर क्लासेन फलंदाजी करण्यासाठी आला होता. आशीष नेहराला वाटते की, जेव्हा मध्यक्रमातील दोन्ही फलंदाज उजव्या हाताने फलंदाजी करणारे होते, तेव्हा अक्षरला चेंडू दिला पाहिजे होता.
आशीष नेहरा म्हणाला की, “विजागमध्ये प्लेइंग इलेव्हनमधील बदल त्याठिकाणीच परिस्थिती पाहून होईल. रिषभ पंतला देखील पाहावे लागेल, कारण त्याने अक्षर पटेलला खूप वेळ थांबवून ठेवले. त्याच वेळी खेळपट्टीवर दोन उजव्या हाताचे फलंदाज होते आणि मला कोणतेच असे कारण दिसत नाही, ज्यामुळे अक्षर पटेलला गोलंदाजी दिली नव्हती पाहिजे.”
यावेळी चर्चेत पार्थिव पटेल देखील उपस्थित होता आणि त्याच्या मते अशा परिस्थितीत कर्णधाराला सामन्याचा अंदाज आला पाहिजे.
पार्थिव पटेल (Parthiv Patel) म्हणाला की, “दुसऱ्या सामन्यात ज्या पद्धतीची परिस्थिती तयार झाली होती, अशा परिस्थितीत खेळ समजून घेणे खूप महत्वाचे असते. खासकरून टी-२० प्रकारात. क्लासेन सुरुवातीला संघर्ष करत होता, पण नंतर त्याने गियर बदलला. या सामन्यात त्याने फिरकी गोलंदाजी चांगल्या पद्धतीने खेळली, पण त्याच्या विरोधात अक्षर पटेलला बोलावण्यासाठी चांगली संधी होती.” दरम्यान, अक्षरने या सामन्यात टाकेलल्या एका षटकात त्याने तब्बल १९ धावा खर्च केल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर कर्णधाराने त्याला पुन्हा गोलंदाजीसाठी बोलावले नाही.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
तिसऱ्या कसोटी सामन्यांत भारतीय संघात होणार ‘हे’ मोठे बदल, जाणून घ्या कशी असेल संघाची ‘प्लेइंग ११’
ऋतुराजला संघात पुन्हा स्थान मिळणे कठीण!, ‘ही’ आहेत त्याची प्रमुख कारणे
धोनी खरंच भारीये राव!, साक्षी सिंग धोनीने शेअर केलेला व्हिडिओ पाहून तु्म्हीही हेच बोलणार