शुक्रवारपासून (०५ फेब्रुवारी) भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाहुण्या इंग्लंडने ५७८ धावांचा भलामोठा डोंगर उभारला आहे. प्रत्युत्तरात यजमान भारतीय संघ ५ षटकात १ विकेट गमावत २० धावांवर खेळत आहे. यादरम्यान भारतीय संघाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या एक क्यूट चियरलीडरच्या फोटोची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
भारतीय क्रिकेट नियमाक मंडळ अर्थात बीसीसीआयने त्या चियरलीडरचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. ती क्यूट चियरलीडर अजून कोण नसून भारताचा सलामीवीर रोहित शर्मा याची मुलगी समीरा शर्मा आहे. आपली आई रितीका सजदेहच्या मांडीवर बसून ती भारत-इंग्लंड संघातील कसोटी सामना पाहत आहे.
बीसीसीआयने समीराचा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘आमच्या क्यूट चिमुकल्या चियरलीडरला हॅलो म्हणा.’ समीराचा हा फोटो क्रिकेट रसिकांना भलताच आवडल्याचे दिसत आहे. एका तासातच या फोटोला १९ हजारच्या घरात लाईक्स मिळाल्या आहेत.
Say hello to our cute little supporter 😍#INDvENG pic.twitter.com/CQg8U9c3Tx
— BCCI (@BCCI) February 7, 2021
डावाच्या सुरुवातीलाच भारताला मोठा धक्का
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, इंग्लंडचा कर्णधार जो रुटने २१८ धावांची मोठी आकडी खेळी केली आहे. सोबतच सलामीवीर डॉम सिब्ली (८७ धावा) आणि बेन स्टोक्स (८२ धावा) यांनीही अर्धशतकाहून अधिक धावांचे योगदान दिले आहे. यासह इंग्लंडने भारतापुढे ५७९ धावांचे भलेमोठे लक्ष्य ठेवले आहे.
या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही. भारताचा विस्फोटक सलामीवीर रोहित शर्मा ९ चेंडूत अवघ्या ६ धावा करत पव्हेलियनला परतला. इंग्लंडचा गोलंदाज जोफ्रा आर्चरने जोस बटलरच्या हातून त्याला झेलबाद केले. त्यानंतर शुबमन गिल आणि चेतेश्वर पुजारा फलंदाजी करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
INDvENG Test Live : भारताला मोठा धक्का रोहित शर्मा ६ धावा करुन बाद, भारताच्या १ बाद २२ धावा
शतक सोडा द्विशतक केलं, तरीही धोनीच्या ‘या’ विक्रमाला धक्काही नाही लावू शकला रुट
आता सुरू होणार इंग्लंडची खरी परिक्षा, ‘या’ घातक गोलंदाजाचं होतंय भारतीय संघात पुनरागमन