मुंबई । कोरोनाव्हायरसमुळे मार्चमध्ये सुरू होणारा आयपीएलचा 13 वा हंगाम आता 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे आणि तोही भारताबाहेर. 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत आयपीएल 2020 युएईमध्ये जैव-सुरक्षित वातावरणात होईल. कोरोनामुळे बीसीसीआयला आयपीएलचे आयोजन भारताबाहेर करावे लागले आहे.
आता बीसीसीआय कोरोनामुळे आयपीएल 2021 साठी लिलावाचे आयोजन करणार नसल्याची बातमी येत आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने हे अनिश्चित काळासाठी आयपीएल 2021 चा लिलाव तहकूब केले आहे.
आयपीएलचा 13वा हंगाम 10 नोव्हेंबरला संपेल आणि त्यानंतर आयपीएलचा पुढील हंगाम सुरु करण्यासाठी बीसीसीआयला साडेचार महिने लागतील. भागधारकांचे नुकसान होऊ नये यासाठी बोर्ड 50 दिवसांहून अधिक दिवस आयपीएल आयोजित करणार आहे. मंडळाच्या या निर्णयाशी फ्रँचायझीही सहमत असल्याचे दिसून येत आहे. फ्रँचायझींना चांगलेच माहित आहे की नवीन संघ तयार करण्यासाठी पुरेसा वेळ नाही.
सूत्रांच्या माहितीनुसार, यावेळी मेगा लिलाव करण्यात अर्थ नाही. योग्य वेळेत योजना आखून पूर्ण वेळ आयपीएल आयोजित केले जाऊ शकते. त्यानंतर 2021 हंगामानंतर या गोष्टी दिसू शकतात.
आयपीएलचा लिलाव न करण्याची आणखीही अनेक कारणे आहेत. ती पुढील प्रमाणे –
-लिलाव यादी तयार करण्यासाठी भारतीय आणि परदेशी खेळाडूंशी संवाद साधण्यात बराच वेळ लागू शकेल.
-बोली लावण्यासाठी फ्रेंचायजींना वेळ देणे. लिलावाची तयारी करण्यासाठी साधारणपणे फ्रँचायझीला 4 ते 6 महिने लागतात.
-संघात नवीन खेळाडू जोडल्यानंतर, ब्रँड एक्टिविटीसाठी बराच वेळ लागतो.
ट्रेंडिंग लेख –
फलंदाजांना रडकुंडीला आणणारे कॅरेबियन प्रीमियर लीगमधील ५ सर्वात यशस्वी गोलंदाज
चाहत्यांना नेहमीच क्रिकेटच्या ड्रेसिंग रुमचे कुतूहल असते, मग ती ड्रेसिंग रुम नक्की असते तरी कशी?
आयपीएलच्या तेराव्या हंगामात खेळाडूंकडून होऊ शकतात हे ५ बहुचर्चित विक्रम