क्रिकेटच्या मैदानात अनेक असे क्रिकेटपटू आहेत, जे आपल्या कामगिरीने सर्वांचेच लक्ष वेधून घेत असतात. परंतु चाहत्यांना त्यांच्या मैदानातील कामगिरीसोबत त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घ्यायलाही तितकाच रस असतो. भारतीय संघाचा आक्रमक सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा हा २०१५ मध्ये विवाह बंधनात अडकला होता. पण तुम्हाला माहीत आहे का, एकेकाळी विराट कोहलीमुळे रोहित शर्माचा ब्रेकअप झाला होता. चला पाहूया, काय होते प्रकरण.
तर गोष्ट २०१२ ची आहे. जेव्हा सर्वत्र रोहित शर्मा आणि ‘बिग बॉस’ स्पर्धेची स्पर्धक सोफिया हयात यांच्यात प्रेम प्रकरण सुरू असल्याची चर्चा रंगली होती. सोशल मीडियावर दोघांचे अफेयर सुरू असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. परंतु यांचे प्रेम प्रकरण सुरू होताच संपुष्टात आले होते.
रोहित शर्मा सोफिया हयातच्या प्रेमात क्लीन बोल्ड झाला होता. दोघांमध्ये सर्व काही सुरळीत असताना काही दिवसांतच बातमी आली होती की, रोहित शर्मा आणि सोफिया हयात यांच्यात ब्रेकअप झाले आहे. ही बातमी ऐकताच सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता. याबाबतची माहिती रोहित शर्माने नव्हे तर सोफियाने ट्विट करत दिली होती.
तिने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर ट्विट केले होते की, “मी रोहितला नाकारले. कारण विराट कोहली खेळपट्टीवर व बाहेर चांगला खेळाडू आहे.”
या ट्विटनंतर सर्वत्र चर्चा रंगायला सुरुवात झाली होती की, विराट कोहलीमुळेच रोहित शर्मा आणि सोफिया हयात यांचे ब्रेकअप झाले. यात किती खरं आणि किती खोटं याबाबत कुठलीही माहिती मिळाली नाही. तसेच रोहित शर्माने देखील याबाबत कुठलाही खुलासा केला नव्हता.
रितिका सोबत केला विवाह
सोफिया हयात सोबत नातेसंबंध संपल्यानंतर लवकरच रोहितचे हृदय रितिका सजदेहसाठी धडधडू लागले होते. जरी त्यांची पहिली भेट कामानिमित्त झाली होती; तरी नंतर ते एकमेकांना भेटू लागले होते. तसेच आधी ते मित्र बनले. मग सोबतच आयुष्य व्यतीत करण्याचा निर्णय घेतला. रोहित आणि रितिका हे दोघे २०१५ मध्ये विवाह बंधनात अडकले होते. दोघांनाही एक गोड मुलगी आहे तिचे नाव त्यांनी समायरा असे ठेवले आहे. रितिका आणि समायरा नेहमी मैदानात सामना पाहण्यासाठी हजेरी लावत असतात.
महत्त्वाच्या बातम्या-
ना रोहित ना विराट ना पुजारा, भारताच्या ‘या’ स्फोटक फलंदाजाला घाबरला बलाढ्य न्यूझीलंड संघ
टी२० क्रिकेटमध्ये ‘सुपर फ्लॉप’ ठरलेले तीन फलंदाज; दोघांचे आहे मुंबई इंडियन्सशी नाते
विराट अन् रोहितचा फोन आला तर कोणाचा कॉल उचलशील? २३७ विकेट्स घेणारा गोलंदाज म्हणतो…