भारतीय कसोटी संघाचा यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहाच्या सिलीगुडी येथील घरात शुक्रवारी (२४ एप्रिल) चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. Attempt to rob Saha’s house
याबद्दल बोलताना साहाने (Wriddhiman Saha) शनिवारी सांगितले की, “माझ्या वडिलोपार्जित घरात चोरीचा प्रयत्न झाला. त्यावेळी माझ्या घरात कोणीही नव्हते. शेजारी राहणाऱ्या काकांनी चोरी करणाऱ्यांना पळवून लावले आणि पोलिसांना याची माहिती दिली.”
चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांमध्ये जवळपास ६ व्यक्तींचा समावेश होता जे कारमधून पळून गेले.
साहा पुढे म्हणाला की, “हे खूप दुर्दैवी होते. आम्ही अशा चोरीबद्दल फक्त लहानपणी ऐकले होते. पोलीस या प्रकरणाची गंभीरतेने चौकशी करतील, अशी अपेक्षा आहे.”
सध्या साहा दक्षिण कोलकातामध्ये आपल्या परिवारासोबत राहतो. साहाचा मोठा भाऊ मुंबईमध्ये काम करतो. तर त्याचे आई-वडील लॉकडाऊनमुळे कोलकातामध्ये अडकले आहेत. त्यामुळे त्यांना सिलीगुडीमध्ये येता आले नाही.
“कदाचित त्या चोरांना याबद्दल माहिती होते. त्यामुळे ते शुक्रवारी जवळपास रात्री २ च्या सुमारास सिलीगुडी (Siliguri) येथील घरात मागील दरवाजाने शिरले होते,” असेही साहा पुढे म्हणाला.
साहाच्या या घरात सीसीटीव्ही लावण्यात आला आहे. याच्या मदतीने पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
साहाने भारताकडून आतापर्यंत ३७ कसोटी सामने आणि ९ वनडे सामने खेळले आहेत. यामध्ये कसोटीत त्याने ३०.१९ च्या सरासरीने १२३८ धावा केल्या आहेत. तसेच वनडेत त्याने केवळ ४१ धावा केल्या आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी-
-बापरे! २०१९ क्रिकेट विश्वचषकात मिळालेलं जोफ्रा आर्चरच मेडल हरवलं, पुढे…
-आयपीएलमधून करोडो रुपये कमावणारे ५ परदेशी खेळाडू
-लिटिल मास्टर गावसरकरांचे चालू सामन्यात चक्क अंपायरने कापले होते केस!