क्रिकेट खेळाला मोठी इतिहास आहे. आधी कसोटी, मग वनडे व आता टी२० क्रिकेटपर्यंत हा प्रकार पोहचला आहे. काही देशांत तर १० षटकांची किंवा १०० चेंडूंचीही स्पर्धा सुरु झाली आहे. अशा या खेळात आजपर्यंत मैदानावर घडलेले अनेक किस्से आपण पाहिले आहेत. एवढा मोठा इतिहास असूनही या खेळात रोज नवे काहीतरी घडत असतेच. याचा आनंद जसे मैदानावरील खेळाडू घेतात, तसाच आनंद प्रत्यक्ष मैदानातून पाहाणारे प्रेक्षक व टीव्हीच्या माध्यमातून पाहाणारे प्रेक्षकही घेत असतात. अशातच जर खेळाडू मैदानावर काही चुकिची गोष्ट करत असेल तर जंटलमॅन्स गेम ओळख असलेल्या क्रिकेटच्या पावित्र्याला कुठेतरी धोका बसतो, असेत काहीसे काऊंटी चॅम्पियनशीपमध्ये पाहायला मिळाले आहे.
झाले असे की, मिडलसेक्स विरुद्ध हॅंपशायर सामन्यात निक गुबिंस या खेळाडूने शानदार अर्धशतकी खेळी केली. याचदरम्यान तो हॅंपशायरचा वेगवान गोलंदाज केथ बार्करने घेतलेल्या फिरकीचा शिकार झाला. जेव्हा गुबिंसने बार्करच्या गोलंदाजीवर एक चोरटी धाव घेतली व तो नॉन स्ट्राईकर एंडला आला, तेव्हा तो जमिनीवर पडला. तेथे पुन्हा रनअपवर जात असलेल्या बार्करने त्याला उभं राहण्यासाठी हात पुढे केला. गुबिंसनेही हात देण्यासाठी हात वर केला परंतू मजाकच्या मुडमध्ये असलेल्या बार्करने आपला हात मागे घेतला व तो सरळ रनअपच्या दिशेने चालत गेला.
परंतु, यामुळे गुबिंसचं मात्र चांगलंच हसू झालं. अनेकांना ही घटना एक मजाक वाटत आहे, तर अनेकांच्या मते बार्करने खेळभावनेला अनुसरुन वर्तण केले नव्हते. द ग्रेड क्रिकेटर या ट्विटर अकाऊंटवरुन टाकलेल्या या व्हिडीओला जवळपास सव्वा लाख लोकांनी पाहिले आहे.
Alpha’s gonna alpha pic.twitter.com/VDCfMO6qZh
— The Grade Cricketer (@gradecricketer) May 15, 2021
This is against the spirit of the cricket 😂
— KS (@twenty_four_k) May 15, 2021
@nanillacnadroj no idea why this is so fucking funny 😆😂
— Zac Mexon (@Zac_Mex) May 15, 2021
@M_C_Curzon I love it
— Jack Mitchell (@jackm1708) May 15, 2021
निक गुबिंसने या सामन्यात मिडलसेक्सकडून खेळताना ५१ धावांची खेळी केली. त्याच्या याच खेळीच्या जोरावर संघाने १७२ धावा बनविल्या. त्यानंतर हॅंपशायरकडून फलंदाजी करताना कर्णधार जेम्स विंसीने ६२ धावा केल्या. यामुळे संघाने २०८ धावा दुसऱ्या डावात केल्या. गमतीचा भाग म्हणजे बार्करने ८व्या क्रमांकावर फलंदाजीला येत ८४ धावांची धमाकेदार खेळी केली. मिडलसेक्स दुसऱ्या डावातही कमबॅक करु शकले नाही व त्यांनी केवळ १०१ धावा बनविल्या. ६६ धावांचे लक्ष घेऊन मैदानात आलेल्या हँपशायरने तीन विकेट गमावत सामना खिशात घातला.
महत्त्वाच्या बातम्या –
पुढील ३ जन्म सौरव गांगुलीला करायचंय हेच काम, स्वत: पोस्ट करत दिली माहिती