इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिकेतील चौथा सामना ओव्हलवर खेळला जात आहे. भारतीय संघाने चौथ्या दिवशी सामन्यामध्ये दमदार पुनरागमन केले आहे. भारतीय संघ सामन्याच्या पहिल्या डावात १९१ धावांवर स्वस्तात गुंडाळला गेला होता. मात्र, त्यानंतर दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी अप्रतिम फलंदाजीचे प्रदर्शन करत संघाची स्थिती मजबूत केली आहे. दुसऱ्या डावात सलामीवीर रोहित शर्माने शतकी खेळी केली. त्याव्यातिरिक्त चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत आणि शार्दुल ठाकुर यांनी त्याची अर्धशतके करत भारतीय संघाने इंग्लंवर ३६८ धावांची आघाडी घेतली. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने बिनबाद ७७ धावा केल्या आहेत.
भारतीय संघाने सामन्यात केलेल्या दामदार पुनरागमन आणि तिसऱ्या व चौथ्या दिवशी फलंदाजांनी केलेले उत्कृष्ट प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआय अध्यक्ष आणि भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुलीने आनंद व्यक्त केला आहे.
चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाची जिंकण्याची आशा निर्माण झाल्यानंतर त्यांनी एक ट्विट करत आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, “क्रिकेट त्याच्या सर्वोत्कृष्ट स्थितीत आहे, चांगल्या प्रकारे लढलेल्या कसोटी मालिकेत भारताला कोणीच हरवू शकत नाही. एकदा ऑस्ट्रेलियामध्ये आणि आता इथे… भारताचे क्रिकेटमधील सर्वात कुशल प्रदर्शन.”
Cricket at its best..Nothing can beat a well fought test series..The one in Australia and now this one ..The most skilfull form of cricket ..@BCCI
@ICC— Sourav Ganguly (@SGanguly99) September 5, 2021
तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी भारतीय फलंदाजांचे वर्चस्व
सामन्याच्या तिसऱ्या दिवशी मैदानावर तळ ठोकत रोहित शर्माने १२७ धावांची खेळी केली. त्यानंतर पुजारानेही चांगले प्रदर्शन करत ६१ धावा केल्या. सामन्याच्या चौथ्या दिवशी रिषभ पंतने १०६ चेंडूत ५० धावा केल्या. शार्दुल ठाकुरने सामन्यातील त्याचे दुसरे अर्धशतक केले. त्याने दुसऱ्या डावा ७२ चेंडूत ७ चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने ६० धावा केल्या. शार्दुल आणि पंत केवळ ४ चेंडूंच्या अंतराने बाद झाले. अखेर जसप्रीत बुमराह आणि उमेश यादव यांनीही संघाच्या धावसंखेत त्यांचे योगदान दिले आणि ९ व्या विकेटसाठी ३६ धावा केल्या. अशाप्रकारे भारताने सांघिक कामगिरीच्या जोरावर संघावर पकड बनवली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आधी शार्दुल मग रिषभ, मांजरेकरांचे कौतुकास्पद बोल अन् लयीतील फलंदाज तंबूत; झाले ट्रोल
ओव्हलवरील दे दणादण प्रदर्शनाने शार्दुल बनला भारताचा नवा नायक, पण ‘या’ खेळाडूंची जागा धोक्यात
ओव्हल कसोटी जिंकण्यासाठी इंग्लंडला चमत्काराची गरज! भारताविरुद्धची ‘ही’ आकडेवारी देते ग्वाही