दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ लवकरच ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे. या दौऱ्यावर तीन सामन्यांची महत्त्वाची कसोटी मालिका खेळली जाईल. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दृष्टीने ही मालिका अत्यंत महत्त्वाची आहे. या मालिकेत प्रेक्षकांना चांगली चुरस पाहायला मिळू शकते. मात्र, या मालिकेआधी दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिस याने आपल्या आत्मचरित्रात एक महत्त्वाचा खुलासा केला आहे.
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ 2017-2018 या कालावधीत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेलेला. याच दौऱ्यावेळी वादग्रस्त असे बॉल टेम्परिंग प्रकरण समोर आलेले. ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी चेंडूचा आकार बदलण्यासाठी सॅंडपेपरचा वापर केलेला. यासंबंधीचे सर्व पुरावे सापडल्यानंतर तत्कालीन ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर व कॅमेरून बेनक्रॉफ्ट या तिघांना काही काळासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबित करण्यात आले होते.
आता जवळपास पाच वर्षानंतर त्या वेळचीच एक घटना तत्कालीन दक्षिण आफ्रिका कर्णधार फाफ डू प्लेसिस याने आपल्या आत्मचरित्रात लिहिली आहे. त्याने लिहिले,
“त्या दौऱ्यावेळी स्टीव्ह स्मिथ हा आमचा गोलंदाज कगिसो रबाडा याच्या अंगावर गेलेला. त्याने एखाद्या फुटबॉलपटूसारखे रबाडाला टक्कर दिलेली. त्याला माहीत होते की, रबाडाने त्याला प्रतिक्रिया दिली असती तर तो कारवाईला सामोरा गेला असता. मात्र, बॉल टेम्परिंग प्रकरणामुळे त्या गोष्टीची फारशी चर्चा झाली नाही.”
त्या दौऱ्यावेळी पोर्ट एलिझाबेथ येथील दुसऱ्या कसोटीत स्मिथला बाद केल्यानंतर रबाडाने त्वेषपूर्ण जल्लोष केलेला. त्यावेळी आयसीसीने रबाडाला दोन सामन्यांसाठी निलंबित करत असल्याची घोषणा केली. मात्र, नंतर हा निर्णय मागे घेण्यात आला होता. याच कारणामुळे स्मिथ नाराज असल्याचे सांगण्यात येत होते.
(Faf Du Plessis Important Revelation About Steve Smith In His Autobiography)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! भारतीय दिग्गजाने ‘या’ क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाचा दिला राजीनामा, बोर्डाने दिली माहिती
‘तुझी बहीण असल्याचा मला…’, अर्जुन तेंडुलकरच्या शतकानंतर साराची लक्षवेधी पोस्ट; एकदा पाहाच