नॉटिंगघम। इंग्लंड विरुद्ध भारत चौथ्या कसोटीत विराट कोहलीने कसोटीत ६ हजार धावांचा टप्पा पार केला. त्याला हा पराक्रम करण्यासाठी केवळ ६ धावांची गरज होती.
विराटचा हा कसोटी कारकिर्दीतील ७०वा सामना आहे. भारताच्या या २९ वर्षीय कर्णधाराने ७० सामन्यातील ११९ डावात ५४.५७च्या सरासरीने ६००३ धावा केल्या आहेत.
कसोटीत जलद ६ हजार धावा करण्याचा विक्रम अपेक्षेप्रमाणे सर डाॅन ब्रॅडमन यांच्या नावावर आहे. त्यांनी केवळ ६८ डावात हा कारनामा केला होता.
तर भारतीय खेळाडूंमध्ये सुनिल गावसकर यांनी ११७ डावात तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने मार्च २०००मध्ये वयाच्या २६व्या वर्षी १२० डावात हा कारनामा केला होता.
७६व्या कसोटी सामन्यात बेंगलोरला पहिल्याच डावात ५ धावा करत सचिनने कसोटीत ६ हजार धावांचा टप्पा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पार केला होता.
सचिन हा जगातील असा एकमेव खेळाडू आहे ज्याने वयाची २७ वर्ष पुर्ण होण्यापुर्वी कसोटीत ६ हजार धावा केल्या होत्या.
कोहलीला हा डावांचा विक्रम मोडत नविन विक्रम करण्याची मोठी संधी साधली आहे.
सध्या खेळत असलेल्या केवळ स्टीव स्मिथने कोहलीपेक्षा कमी डावात (१११) हा पराक्रम केला आहे.
कसोटीत जलद ६ हजार धावा करणारे भारतीय खेळाडू (कमी डावात)
११७- सुनिल गावसकर
११९- विराट कोहली
१२०- सचिन तेंडुलकर
कसोटीत जलद ६ हजार धावा करणारे खेळाडू (कमी डावात)
६८- डाॅन ब्रॅडमन
१११- सर गारफिल्ड सोबर्स
१११- स्टीव स्मिथ
११४- विली हेमंड
११६- सर लेन ह्युटन
११६- केन बॅरिंगटन
११६- कुमार संगकारा
११७- सुनिल गावसकर
११९- विराट कोहली
१२०- सर व्हीव्हीयन रिचर्ड्स
१२०- सचिन तेंडुलकर
१२०- मोहम्मद युसुफ
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
– बरोबर ५० वर्षांपुर्वी या खेळाडूने एकाच षटकात मारले होते ६ षटकार
– याच दिवशी ७ वर्षांपुर्वी द्रविडने घेतला होता क्रिकेटमधील सर्वात मोठा निर्णय
– वाढदिवस विशेष- जवागल श्रीनाथबद्दल माहित नसलेल्या ५ गोष्टी
– टाॅप ४- जसप्रीत बुमराहचे ते ४ नो बाॅल आणि इतिहास…
– ५२६ कसोटी सामन्यांत टीम इंडियाकडून पहिल्यांदाच असे घडले
– अश्विन चौथ्या कसोटीत चमकला, कुंबळे- भज्जीच्या यादीत सामील