चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये रविवारी (१० ऑक्टोबर) चुरशीची लढत पाहायला मिळाली. पहिल्या क्वालिफायरच्या लढतीत चेन्नई सुपर किंग्स संघाने ४ गडी राखून विजय मिळवला. यासह त्यांनी आयपीएल २०२१ स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. दिल्लीच्या १७३ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या चेन्नई सुपर किंग्स संघाकडून ऋतुराज गायकवाड आणि रॉबिन उथप्पा यांनी ११० धावांची भागीदारी केली होती. ही भागीदारी तोडण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स संघातील गोलंदाजांनी अनेक प्रयत्न केले.
दरम्यान अनुभवी फिरकीपटू आर अश्विनने देखील असे काही कृत्य केले होते, जे पाहून डगआऊटमध्ये बसलेल्या रिकी पाँटिंगला देखील हसू आवरले नव्हते.
या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाकडून पृथ्वी शॉने ३४ चेंडूंमध्ये ७ चौकार आणि ३ षटकारांचा साहाय्याने ६० धावांची खेळी केली. तर कर्णधार रिषभ पंतने ३ चौकार आणि २ षटकारांचा साहाय्याने नाबाद ५१ धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्स संघाला २० षटक अखेर ६ बाद १७२ धावा करण्यात यश आले होते
या धावांचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्स संघाकडून ऋतुराज गायकवाड आणि रॉबिन उथप्पा या दोघांनी ११० धावांची भागीदारी केली होती. ऋतुराज गायकवाडने या डावात ७० धावांची महत्वपूर्ण खेळी केली. तर रॉबिन उथप्पा ६३ धावा करत माघारी परतला होता. जेव्हा हे दोघे फलंदाज खेळपट्टीवर होते त्यावेळी दिल्ली कॅपिटल्स संघातील गोलंदाजांनी त्यांना बाद करण्यासाठी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला होता.
तर झाले असे की, ९ वे षटक सुरू असताना आर अश्विन गोलंदाजीला आला होता. त्यावेळी चौथा चेंडू टाकत असताना आर अश्विनने रनअप घेतला आणि चेंडू टाकणार इतक्यात तो थांबला. त्यानंतर त्याने पुन्हा एकदा चेंडू टाकण्यासाठी रनअप घेतला. त्यावेळी चेंडू टाकणार इतक्यात ऋतुराज गायकवाड यष्टीसमोरून सरकला.
https://twitter.com/Sunainagosh7/status/1447243220073672704?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1447243220073672704%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fndtv.in%2Fcricket%2Fdc-vs-csk-qualifier-1-first-ashwin-showed-such-tricks-to-test-rituraj-then-the-young-player-took-revenge-ricky-ponting-started-laughing-after-seeing-w-hindi-2571091
हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. आर अश्विनने रनअप घेऊनही चेंडू न टाकण्यामागचे कारण हे होते की, त्याला हे जाणून घ्यायचे होते त्याच्या गोलंदाजीवर ऋतुराज गायकवाड कुठला शॉट खेळणार आहे. आर अश्विन आणि ऋतुराज गायकवाड यांच्यातील हा प्रकार पाहून डगआऊटमध्ये बसलेल्या रिकी पाँटिंगला देखील हसू अनावर झाले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
हे फक्त धोनीच करू शकतो! ‘कॅप्टनकूल’ने वाचल्या ऋतुराजच्या डोक्यातील गोष्टी, स्वत:च केला उलगडा
‘बॉक्स ऑफिसमध्ये सलमान आणि मोठ्या सामन्यात…’, जुना संघसहकारी केदारकडून धोनीचे खास शब्दांत कौतुक