भारताच्या एकोणीस वर्षाखालील क्रिकेट संघाचा माजी कर्णधार व सौराष्ट्राला २०१९-२०२० रणजी ट्रॉफी चे विजेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावणारा यष्टीरक्षक अवि बरोट याचे कार्डियाक अरेस्टमूळे वयाच्या अवघ्या २९ व्या वर्षी निधन झाले. त्याच्या निधनानंतर भारतीय क्रिकेटवर्तुळावर शोककळा पसरली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शहा यांनी त्याच्या निधनावर दुःख व्यक्त केले.
सौराष्ट्र क्रिकेट संघटनेने केली पुष्टी
सौराष्ट्र क्रिकेट संघटनेने अवि बरोटच्या निधनाचे वृत्त सांगताना म्हटले,
‘हरियाणा व गुजरात संघासह सौराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अवि बरोट यांचे शुक्रवारी कार्डियाक अरेस्टमूळे निधन झाले. आम्ही त्याच्या निधनानंतर स्तब्ध झालो आहोत.’
अशी राहिली कारकीर्द
उजव्या हाताचा फलंदाज व यष्टीरक्षक असलेल्या अवि बरोटने आपल्या कारकीर्दीत ३८ प्रथमश्रेणी, ३८ लिस्ट ए व २० टी२० सामने खेळले होते. त्याने प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये १५४७, लिस्ट ए क्रिकेटमध्ये १०३० व टी२० मध्ये ७१७ धावा केल्या होत्या. त्याने २०११ साली भारताच्या एकोणीस वर्षाखालील क्रिकेट संघाचे नेतृत्व केले होते. त्यानंतर, २०१९-२०२० मध्ये सौराष्ट्राने जिंकलेल्या पहिल्यावहिल्या रणजी ट्रॉफीच्या विजयात त्याचे मोलाचे योगदान होते.
महत्त्वाच्या बातम्या-
https://mahasports.in/dhoni-said-kkr-are-deserving-winner/
https://mahasports.in/list-of-man-of-the-match-in-ipl-finals-of-every-season/