भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरला प्रतिभावान खेळाडूंची ओळख आहे. आयपीएलच्या १३ व्या हंगामात माजी भारतीय सलामीवीरने जागतिक क्रिकेटवर वर्चस्व गाजविणार्या काही युवा फलंदाजांची नावे सांगितली आहेत. वेस्ट इंडिजचा सर्वात हुशार फलंदाज निकोलस पूरण यामधील एक आहे.
निकोलस आयपीएल २०२० मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळताना दिसणार आहे. गंभीर २४ वर्षांच्या निकोलसवर इतका प्रभावित झाला आहे की त्याने एबी डिविलियर्ससोबत त्याची बरोबरी केली. आणि म्हणाला की वेस्ट इंडिजचा हा फलंदाज मैदानाच्या चारही बाजूला फटके मारू शकतो.
गंभीर म्हणाला की, अनिल कुंबळेच्या नेतृत्वात निकोलस पूरणने अधिक चांगली कामगिरी केली पाहिजे. ‘क्रिकेट कनेक्टेड’ या कार्यक्रमात बोलताना गंभीर म्हणाला की, “माझ्यासाठी निकोलस हा एक युवा खेळाडू आहे. ज्याला मी आयपीएलमध्ये खेळताना पाहू इच्छित आहे. आपण डिविलियर्सबद्दल बोलताना त्याला ३६० डिग्री खेळाडू म्हणतो. पण निकोलसकडे सर्व प्रकारचे शॉट्स आहेत. तो रिव्हर्स स्वीप, नॉर्मल स्वीपसह मोठे शॉट्स खेळण्यास सक्षम आहे.”
तो पुढे म्हणाला, “जेव्हा असा खेळाडू अनिल कुंबळेसारख्या प्रशिक्षकाच्या नेतृत्वाखाली खेळतो, तेव्हा त्याचा आत्मविश्वास नक्कीच वाढतो. अनिल कुंबळे त्याच्याकडून सर्वोत्तम कामगिरी करून घेऊ शकतो. तो एक मोठा प्रशिक्षक आहे. तो किंग्ज इलेव्हन पंजाबला विजेतेपदही जिंकून देऊ शकेल.”
आणखी एक माजी क्रिकेटपटू न्यूझीलंडच्या स्कॉट स्टायरिसनेही निकोलस पूरनचे कौतुक केले आहे. तो म्हणाला, “निकोलस सारख्या खेळाडूंना मोठी भूमिका दिली पाहिजे. किंग्ज इलेव्हन पंजाबसाठी ही एक मोठी स्पर्धा असल्याचे मला वाटते. त्याला जबाबदारी द्यायला हवी. त्याला वरच्या क्रमात पाठवावे जेणेकरून त्याला जास्त चेंडू खेळायला मिळतील.”
महत्त्वाच्या बातम्या-
-अर्जुन तेंडूलकरचे फोटो होतायत व्हायरल, थेट मुंबई इंडियन्सच्या…
-थेट ख्रिस गेलला बाहेरचा रस्ता दाखवून दिग्गजाने असा तयार केला पंजाबचा संघ
-अनुष्काने शेअर केलेल्या फोटोवर पती विराटने केली हृदयस्पर्शी कमेंट
ट्रेंडिंग लेख-
-४ असे माजी कर्णधार, जे यावेळी होऊ शकतात संघासाठी वॉटरबॉय
-एक आयपीएल फॅन म्हणून हे ५ संस्मरणीय क्षण विसरणे केवळ अशक्य…!!!
-मुंबई इंडियन्सला ५व्यांदा विजयी करण्यासाठी हे तीघे खेळाडू करणार जीवाचं रान