लॉर्ड्स कसोटीच्या पाचव्या दिवशी (१६ ऑगस्ट) भारताने यजमान इंग्लंडवर १५१ धावांनी विजय मिळवला. शेवटच्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा सामना इंग्लंडच्या बाजूने झुकलेला. मात्र, अनेक चढ-उतारानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय संघाने विजयाची नोंद केली. लॉर्ड्सवर भारताचा हा तिसरा कसोटी विजय आहे. या ऐतिहासिक विजयानंतर सामन्यात प्लेइंग इलेव्हनचा भाग असलेल्या भारतीय खेळाडूंनी ट्विटरवरून आपापल्या भावना व्यक्त केल्या.
कर्णधार विराट कोहली-
भारतीय संघाचा संघनायक विराट कोहलीने या संस्मरणीय विजयानंतर ट्विट करत लिहिले,
‘हा क्रिकेटचा सर्वोत्तम खेळ ठरला.. सर्वांनी या विजयात पुढाकार घेऊन समर्पण आणि जिगर दाखवली. आणखी पुढे जायचे आहे बॉईज’
https://twitter.com/imVkohli/status/1427342349349244953?s=19
उपकर्णधार अजिंक्य रहाणे-
भारताचे उपकर्णधार अजिंक्य रहाणे याने दुसऱ्या डावात महत्त्वपूर्ण ६१ धावांची खेळी करत संघाला सामन्यात पुनरागमन करून दिले होते. त्याने या विजयाबद्दल लिहिले,
‘क्रिकेटच्या पंढरीत आमच्यासाठी हा मोठा निकाल आहे. आपण पुढे जाऊयात’
https://www.instagram.com/p/CSpPq0iBuy5/?utm_medium=copy_link
केएल राहुल-
या ऐतिहासिक विजयात पहिल्या डावामध्ये शतकी खेळी करणारा सलामीवीर केएल राहुल याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. त्याने या विजयाबद्दल लिहिले,
‘हा चिरकाल आठवणीत राहणारा विजय आहे’
https://twitter.com/klrahul11/status/1427349645378801677?s=19
रोहित शर्मा-
भारतीय संघाचा अनुभवी सलामीवीर रोहित शर्मा याने पहिल्या डावात महत्त्वपूर्ण ८३ धावांची खेळी केली होती. त्याने या संस्मरणीय विजयाबद्दल लिहताना म्हटले,
‘आम्हा सर्वांना हा विजय हवा होता. तुम्ही हे पाहिलं, अनुभवलं आणि सर्वांनी अप्रतिम खेळ केला.’
https://twitter.com/ImRo45/status/1427361966478217221?s=19
चेतेश्वर पुजारा-
मागील काही सामन्यापासून अपयशी ठरत असलेल्या अनुभवी चेतेश्वर पुजाराने या कसोटीत दुसऱ्या डावामध्ये अजिंक्य रहाणेसोबत महत्त्वपूर्ण शतकी भागीदारी केली. त्याने या विजयानंतर म्हटले,
‘उत्कृष्ट सांघिक कामगिरी आणि अविस्मरणीय विजय. कसोटी क्रिकेटमध्ये यापेक्षा अप्रतिम काही नाही.’
https://twitter.com/cheteshwar1/status/1427330840694968331?s=19
ईशांत शर्मा-
भारताचा सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज ईशांत शर्माने या सामन्यात मोक्याच्या वेळी इंग्लंडचे पाच गडी बाद करून सामन्यात रंगत निर्माण केली होती. त्याने या विजयानंतर लिहिले,
‘पूर्ण समर्पण आणि पूर्ण विजय. वेलडन बॉईज. हे टीम इंडियाकडून भारत देशासाठी होते.’
मोहम्मद सिराज-
प्रथमच लॉर्ड्सवर खेळत असलेल्या वेगवान गोलंदाज मोहम्मद सिरजने या सामन्यात दोन्ही डावात प्रत्येकी चार बळी मिळवले. भारताला विजय मिळवून देण्यात त्याची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली. त्याने या विजयानंतर ट्विट करत लिहिले,
‘स्वतःवर विश्वास ठेवणे ही जादू असते. तुम्ही ते करू शकला तर सर्वकाही करू शकता. अविश्वसनीय विजय व उत्कृष्ट सांघिक कामगिरी.’
https://twitter.com/mdsirajofficial/status/1427375725443641345?s=19
मोहम्मद शमी
भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने गोलंदाजी आणि फलंदाजी अशा दोन्ही विभागात आपले योगदान दिले. दुसऱ्या डावात नवव्या क्रमांकावर फलंदाजीला येत त्याने नाबाद अर्धशतक झळकावून भारतीय संघाची आघाडी वाढवली. त्याने या विजयानंतर ट्विट करताना म्हटले,
‘जेव्हा तुम्ही कष्ट घेत असतात त्याचा परिणाम मैदानावर दिसतो. वैयक्तिक मला फलंदाजीत योगदान दिल्याचा आनंद होत आहे. बुमराहसोबतची भागीदारी विशेष होती.’
https://twitter.com/MdShami11/status/1427356735405178882?s=19
जसप्रीत बुमराह-
भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज असलेल्या जसप्रीत बुमराहने दुसऱ्या डावात फलंदाजी करताना मोहम्मद शमीसोबत नवव्या गड्यासाठी नाबाद ८९ धावा जोडल्या. त्याने या विजयानंतर लिहिले,
‘माझ्या भावना मी शब्दात सांगू शकत नाही. या विजयानंतर आम्ही आणखी पुढे जाऊ. संपूर्ण संघाचा अभिमान वाटतो.’
https://twitter.com/Jaspritbumrah93/status/1427349300930129926?s=19
https://twitter.com/RishabhPant17/status/1427335665415458826?s=19
https://twitter.com/imjadeja/status/1427345388265160718?s=19
रिषभ पंत व रवींद्र जडेजा
भारतीय संघाचा यष्टीरक्षक रिषभ पंत व प्रमुख अष्टपैलू रवींद्र जडेजा यांनी ट्विट करताना आपल्या प्रतिक्रिया ट्विटरद्वारे दिल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
लॉर्ड्सवर मिळवलेल्या भारताच्या ऐतिहासिक विजयाची पाच महत्त्वाची कारणं, वाचा सविस्तर