भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआय दरवर्षी क्रिकेटपटू, सपोर्ट स्टाफ, समालोचक आणि इतर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचे पूर्ण नियोजन करुन इंडियन प्रीमियर लीगचे आयोजन करते. परंतु यंदा बीसीसीआयपुढे आयपीएल इतिहासातील सर्वात मोठे संकट उभे टाकले आहे. आयपीएल २०२१ मध्ये सहभागी झालेले तब्बल ३० ऑस्ट्रेलियन सदस्य हंगाम अर्ध्यात सोडून मायदेशी पतरण्याची शक्यता आहे. भारतातील कोरोनाचा वाढता प्रकोप हे यामागचे मुख्य कारण ठरले आहे.
भारतातील कोरोनाची दिवसेंदिवस बिघडत चाललेली परिस्थिती पाहता ऑस्ट्रेलियाच्या सरकारने भारतामध्ये जाणारी विमाने रद्द केली आहेत. यानंतर लवकरच ऑस्ट्रेलियाच्या भारताकडील सीमारेषा बंद होण्याची शक्यता आहे. अशात आयपीएल २०२१ साठी भारतात आलेले ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू आपण भारतातच अडकून पडू म्हणून चिंतेत आहेत.
ऑस्ट्रेलियाच्या ९ न्यूजमधील वृत्तानुसार, डेविड वॉर्नर आणि स्टिव्ह स्मिथसह इतर ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ऑस्ट्रेलियाच्या सीमा बंद होण्याच्या कारणामुळे मायदेशी परतण्याची शक्यता आहे. एवढेच नव्हे तर, क्रिकेटपटूंव्यतिरिक्त प्रशिक्षक, समालोचक आणि इतर पदभार सांभाळत आयपीएल २०२१ चा भाग असलेले ३० ऑस्ट्रेलियन सदस्य भारत सोडण्यासाठी इच्छुक आहेत. असे झाल्यास, आयपीएल आणि बीसीसीआयला मोठा धक्का बसू शकतो.
आतापर्यंत ऑस्ट्रेलियाच्या ३ क्रिकेटपटूंनी उर्वरित हंगामातून माघार घेतली आहे. यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे खेळाडू ऍडम झम्पा, केन रिचर्डसन आणि राजस्थान रॉयल्सचा अँड्र्यू टाय यांचा समावेश आहे. तसेच सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नर, दिल्ली कॅपिटल्सचा दिग्गज फलंदाज स्टिव्ह स्मिथ या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनी याबद्दल कसलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
सनराझर्समागचं दृष्टचक्र संपेना, संघ पिछाडीवर असताना कर्णधार उर्रवित हंगामातून घेणार माघार?
पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यापूर्वी का करण्यात आला दिनेश कार्तिकचा सन्मान? ‘हे’ आहे कारण