भारत आणि ऑस्ट्रेलिया संघामधील दुसरा कसोटी सामना सिडनी क्रिकेट ग्राउंड येथे खेळला जात आहे.या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात दमदार कामगिरी करत भारतीय गोलंदाजांवर दडपण बनवले होते. ऑस्ट्रेलिया आता मोठी धावसंख्या उभारणार असे वाटत असतानाच जडेजाच्या गोलंदाजीवर कर्णधार अजिंक्यने मार्नस लॅब्यूशानेचा शानदार झेल टिपला व भारताला सामन्यात पुनरागमन करून दिले.
ऑस्ट्रेलियाच्या डावातील 71वे षटक टाकण्यासाठी जडेजा गोलंदाजीसाठी आला होता. यावेळी लॅब्यूशाने पूर्णता स्थिरावला होता, व तो 91 धावांवर खेळत होता. लॅब्यूशाने आता मोठी धावसंख्या उभारणार असे वाटत असताना जडेजाच्या एका चेंडूवर तो फसला व चेंडू स्लीपमध्ये उभ्या असलेल्या अजिंक्यकडे गेला. अजिंक्यने अतिशय चपळाईने झेल घेत लॅब्यूशानेचा डाव संपवला. अजिंक्यच्या या झेलचे सर्व समालोचकांनी देखील कौतुक केले आहे.
Out – Labuschagne is out for 91 following a sharp catch from Rahane at slip.
Live #AUSvIND: https://t.co/xdDaedY10F pic.twitter.com/CzSnX2Hiv4
— cricket.com.au (@cricketcomau) January 8, 2021
लॅब्यूशाने बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव ढेपाळला. पण असे असले तरी स्टिव्ह स्मिथने आपले कारकिर्दीतील 27 वे शतक पूर्ण केले. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद 338 धावा केल्या. त्यांच्याकडून स्मिथ आणि लॅब्यूशानेव्यतिरिक्त पदार्पण करणाऱ्या विल पुकोस्कीने 62 धावांची खेळी केली.
भारताकडून जडेजाने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर नवदीप सैनी आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. याबरोबरच मोहम्मद सिराजने 1 विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल २०२१ लिलावासाठी ‘या’ संघाकडे आहेत सर्वाधिक पैसे, घ्या जाणून
सिडनी कसोटीत स्टिव्ह स्मिथची जबरा फलंदाजी, शतकासह केली कोहलीची बरोबरी
स्मिथचा नादच खुळा! शतकी खेळी करत ‘या’ विक्रमाच्या यादीत विराटसह सचिन तेंडुलकरलाही टाकले मागे