भारतीय पुरुष हॉकी संघाचा डिफेंडर मनदीप मोर याचे म्हणणे आहे की, नरवानासारख्या छोट्या गावात एस्टो टर्फ मैदान असणे, ही तेथील खेळाडूंसाठी मोठी उपलब्धता असेल. यामुळे युवा खेळाडूंना कमी वयातच खूप मदत मिळणार आहे.
मनदीप म्हणाला की, “मी शब्दात सांगू शकत नाही की, नरवाना गावातील रहिवस्यांसाठी एस्टो टर्फचे मैदान असणे ही किती महत्त्वपूर्ण बाब असू शकते? आमच्या या छोट्या गावात आंतरराष्ट्रीय स्तरावर असल्याप्रमाणे मैदान असणे, ही येथील खेळाडूंसाठी खूप मोठी उपलब्धता ठरेल.”
“लोकांना वाटू शकते की, आमच्या गावात एस्टो टर्फ मैदान बनल्यामुळे आम्हाला एवढा आनंद का होत आहे. पण आमच्यासाठी ही खूप मोठी गोष्टी आहे. कारण यापुर्वी जर अशा मैदानावर कोणत्या खेळाडूला सराव करायचा असेल, तर त्याला नरवानापासून तब्बल १२२ किलोमीटर दूर शाहबाद मारकंडा येथे जावे लागत असायचे. तिथे बसने जाण्यासाठी खेळाडूंना २ तास लागायचे,” असे बोलताना मनदीपने सांगितले.
मनदीपचा जन्म १६ मार्च १९९९ला हरियाणाच्या जिंद जिल्ह्यातील नरवाना गावात झाला होता. त्याने २०१९ साली आपल्या नेतृत्त्वाखाली ज्यूनियर हॉकी संघाला रौप्य पदक जिंकून दिले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल २०२०: चेन्नईच्या पाचव्या पराभवानंतर अशी आहे गुणतालिका, ‘हा’ संघ अद्याप तळाशीच
ख्रिस मॉरिसचा अचूक थ्रो आणि चेन्नईचा ‘तो’ फलंदाज सरळ तंबूत, पाहा
केकेआरचा सुनिल नरेन अडकणार मोठ्या संकटात? गोलंदाजी ऍक्शनमुळे होऊ शकतो बॅन
ट्रेंडिंग लेख-
फलंदाजीत लईच भारी! ‘या’ ३ संघांचा आयपीएल २०२०मध्ये नादच खुळा
आयपीएलमध्ये ‘या’ ४ खेळाडूंना कोणत्याही क्षणी संघ देऊ शकतात नारळ
आयपीएल २०२० : ‘या’ तीन संघांचे प्ले-ऑफमध्ये पोहोचणे जवळपास निश्चित