भारतीय संघाचा महान खेळाडू सचिन तेंडुलकर याच्याविषयी धक्कादायक बातमी समोर येत आहे. सचिनच्या परवानगीशिवाय त्याचे नाव, फोटो आणि आवाजाचा वापर करून वैद्यकीय वस्तूंचा प्रचार करण्याचा प्रकार समोर आला. यानंतर मुंबई पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचे एका अधिकाऱ्याने शुक्रवारी (दि. 12 मे) सांगितले.
सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याच्या एका सहाय्यकाने गुरुवारी (दि. 11 मे) पश्चिम क्षेत्र सायबर पोलिस ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल केली होती, असे त्यांनी सांगितले. या तक्रारीमध्ये सांगण्यात आले की, त्याला एका औषध कंपनीच्या ऑनलाईन जाहिराती दिसल्या, ज्यामध्ये असा दावा करण्यात आला होता की, सचिनने त्याच्या उत्पादनाला मान्यता दिली आहे.
यामध्ये त्याला sachinhealth.in ही वेबसाइटही सापडली. यामध्ये सचिनचा फोटो वापरून या उत्पादनांची जाहिरात केली गेली.
सचिन तेंडुलकर याने कंपनीला त्याचे नाव आणि फोटो वापरण्याची परवानगी दिली नव्हती. त्यामुळे त्याची प्रतिमा मलीन होत असल्यामुळे त्याने त्याच्या सहाय्यकाला कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले, असे तक्रारीत म्हटले आहे.
https://www.instagram.com/p/CsI6eOAsNi7/
माहिती तंत्रज्ञान कायद्याव्यतिरिक्त भारतीय दंडसंहिता कलम 420 (फसवणूक), 465 (बनावट) आणि 500 (बदनामी) अंतर्गत अज्ञात व्यक्तींविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आली आहे. तसेच, अधिक तपास सुरू असल्याचेही अधिकाऱ्याने पुढे सांगितले. (master blaster Sachin Tendulkar name used for endorsement of medicinal products without permission read more)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रोहित-विराटचा पत्ता कट! रवी शास्त्रींनी ‘या’ कारणास्तव टी-20चा कर्णधार म्हणून घेतले पंड्याचे नाव
वानखेडेत ‘पलटण’ने गमावला टॉस, रोहितसेनेची पहिली बॅटिंग; गुजरात प्ले-ऑफमध्ये करणार का एन्ट्री?